आम्ही पोलिसांना घाबरणार नाही, हे उद्घाटन महाराष्ट्र बघेल; पडळकरांची डरकाळी 

सांगली – सांगलीतल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा वाद पेटला आहे. खासदार शरद पवारांच्या हस्ते लोकार्पण करण्यास भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कडाडून विरोध केला आहे. आता पडळकर यांच्यासोबत माजी  सदाभाऊ खोतही पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरले आहेत.

मेंढपाळाच्या हस्तेच लोकार्पण सोहळा व्हायला हवा, अशी भूमिका पडळकर यांनी मांडली असून धनगर समाजाचा देखील पडळकर याना पाठींबा मिळताना दिसत आहे. दरम्यान,आम्ही आमच्या परंपारिक पद्धतीने इथे आलो आहे. धनगरी नृत्यही यावेळी सादर करण्यात येणार आहे. हा आमच्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे. असं पडळकर म्हणाले.

हा लोकार्पण सोहळा आमच्या मंढपाळांच्या हस्ते पार पडणार आहे. मात्र अशा मेंढपाळांना सरकार विरोध करून पद मोठी मनं छोटी याचे दर्शन घडवत आहेत. असा हल्लाबोल गोपीचंद पडकर यांनी केला आहे. आम्ही पोलिसांना घाबरणार नाही, पोलिसांनी अडवूनही एवढे लोक याठिकाणी पोहोचले, हे उद्घाटन महाराष्ट्र बघेल असे थेट आव्हान गोपीचंद पडळकर यांनी दिलंय.