‘आपलं लग्न नाही होऊ शकत…’, अभिनेत्री हुमा कुरेशी शिखर धवनला असे का म्हणाली?

भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन (Shikhar Dhawan) सध्या क्रिकेटपासून दूर असला तरी तो सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो अनेकदा त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मजेदार व्हिडिओ पोस्ट करतो. त्याच्या चाहत्यांना ते आवडतात देखील. अलीकडेच शिखर धवनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो अभिनेत्री हुमा कुरेशीसोबत (Huma Qureshi) जुगलबंदी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होत आहे.

व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, शिखर धवन हुमा कुरेशीसोबत फोनवर बोलताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हुमा कुरेशी धवनला म्हणते की, मी तुझ्यासोबत लग्न करु शकणार नाही? यावर धवन म्हणतो का? काय झालं? उद्या आपलं लग्न आहे. यानंतर हुमा कुरेशी सॉरी म्हणाली. आणि डोक्याला हात लावत म्हणते तुला फोन लागला का? धवनच्या या मजेदार व्हिडिओला पाहून अनेकांना हसू फुटले. त्यांच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

दरम्यान हुमा कुरेशी आणि शिखर धवन यापूर्वी डबल एक्सएल या बॉलिवूड चित्रपटात दिसले आहेत. यात धवनने कॅमिओ केला आहे. या चित्रपटातील दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडली आहे. शिखर धवनचा पत्नी आयशापासून घटस्फोट झाला आहे. सध्या ते दोघे वेगवेगळे राहतात.