आम्ही थांबणार नाही! ठाकरे सरकारचे भ्रष्टाचार उघड करणारच; किरीट सोमाय्यांची डरकाळी 

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधक भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. यातच खासदार संजय राऊत (Sanjay Raut)आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यामध्ये देखील चांगलेच द्वंद्व सुरु आहे. मोडीत निघालेली आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचावी म्हणून जमा केलेल्या निधीवरून किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर संजय राऊत हे आरोप करत असताना  न्यायालयाने सोमय्या यांना दणका दिला आहे.

आयएनएस विक्रांत बचावसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत घोटाळा केल्याचा पिता- पुत्रांवर आरोप आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. या प्रकरणात किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायालयने फेटाळला आहे. नील सोमय्या यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya)  यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता सोमय्या यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, 10 वर्षा नंतर“विक्रांत वाचवा”या भाजपच्या (BJP) मोहिमे अंतर्गत एक प्रतिकात्मक कार्यक्रम-संजय राऊत अचानक बोगस आरोप पूराव्या शिवाय लावतात“58 कोटी ढापले!”आमच्या भ्रष्टाचार विरुद्ध लढ्या पासून पुनः दिशा-भूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न! आम्ही थांबणार नाही! ठाकरे सरकारचे भ्रष्टाचार उघड करणारच! असं सोमय्या यांनी ठणकावून सांगितले आहे.