छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान सहन करणार नाही – जगदीश मुळीक 

Pune – छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान महाराष्ट्रातील जनता कदापी सहन करणार नाही. छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj ) धर्मवीरच होते आणि त्यांनी धर्मासाठी बलिदान केले. परंतु मतांसाठी अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणारी राष्ट्रवादी काँग्रेस इतिहास बदलू पाहत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तातडीने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी आग्रही मागणी भाजपचे शहर जगदीश मुळीक (BJP city Jagdish Mulik) यांनी केली. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या अवमानकारक व्यक्तव्याच्या निषेधार्थ भाजपा शहराध्यक्ष मुळीक यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

मुळीक पुढे म्हणाले, ‘सर्व सामान्य जनतेच्या मनात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल ज्या भावना आहेत आणि इतिहासामध्ये त्यांच्या जाज्वल्य धर्म प्रेमामुळे त्यांची जी प्रतिमा अधोरेखित झाली आहे त्याच प्रतिमेचा पुनरुच्चार करण्यासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय” असा  नामोल्लेख असलेल्या स्टीकरचे आज प्रकाशन करून वितरण करण्यात आले. अनेक वाहन चालकांनी अत्यंत स्वखुशीने स्वतःच्या वाहनावर हे स्टीकर अभिमानाने लावले. हे स्टीकर संपूर्ण शहरात भाजपा तर्फे वाटण्यात येणार आहेत. सर्व नागरिकांनी हे स्टीकर आपल्या घराच्या दारावर, वाहनांवर, कार्यालयात लावावेत असे आवाहन मुळीक यांनी केले.

मुळीक पुढे म्हणाले,  पवार यांनी केलेले वक्तव्य मागे घेतेले पाहिजे आणि महाराष्ट्रातील शिव प्रेमी जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे यावर भाजप ठाम आहे. यावेळी सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपूरे, दिपक नागपुरे, संदिप लोणकर, (Ganesh Ghosh, Rajesh Yenpure, Deepak Nagpure, Sandeep Lonkar,) यांच्यासह माजी नगरसेवक, शहर पदाधिकारी, युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.