वाघाचे कातडे पांघरुन लांडगा वाघ होत नाही, उपमुख्यमंत्री शिंदे यांचा उबाठावर हल्लाबोल

वाघाचे कातडे पांघरुन लांडगा वाघ होत नाही, उपमुख्यमंत्री शिंदे यांचा उबाठावर हल्लाबोल

Ekanath Shinde |  काहीजणांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. ते आता डोकी फोडण्याची भाषा करत आहेत. मात्र शोले सिनेमातील असरानीप्रमाणे ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी अशी भाषा करु नये. आव्हान देण्यासाठी मनगटात ताकदं असावी लागते. वाघाचे कातडे पांघरुन लांडगा वाघ होत नाही, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केला. ते लोकसभेत हरले, विधानसभेत हरले आणि आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्येही त्यंचा पराभव होणार, असे शिंदे म्हणाले. विदर्भातील देवरी, गोंदिया येथे आयोजित आभार सभेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार सहसराम करोटे यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी व्यासपीठावर मंत्री संजय राठोड, शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे (Ekanath Shinde) म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांची महालाट आली आणि त्यात भलेभले वाहून गेले. काहीजण म्हणाले होते, तुमचा एकही आमदार निवडून येणार नाही. पण विधानसभेतील भाषणात २०० हून अधिक जागा निवडून आणू, अशी मी घोषणा केली होती. निवडणुकीत मी आणि देंवेंद्र फडणवीस यांनी मिळून महायुतीच्या २३२ जागा निवडून आणल्या. मागील अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर काम केले. विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प, जलयुक्त शिवार योजना सुरु केल्या. अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडीने बंद केलेल्या सर्व योजना सुरु केल्या, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या मतदार संघात मुख्यमंत्री असताना ३५०० ते ४००० कोटींचा निधी विकास कामांसाठी दिला, असे ते म्हणाले. नरेंद्र भोंडेकर आणि त्यांची टीम मिळून आपल्याला विदर्भासाठी काम करायचे आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की सत्ता येते आणि जाते, पदं येतात आणि जातात, पुन्हा पदं मिळतात, मात्र लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून मिळालेली ओळख ही सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. शरिरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत महाराष्ट्राला समर्पित काम करेन, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला. मी पदासाठी आणि खुर्चीसाठी कदापी कासावीस झालो नाही आणि होणार नाही. मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातील तमाम जनतेला काय मिळाल हे पाहणारा मी आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे. लोक शिवसेनेत येत आहे कारण हा पक्ष सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शेअर मार्केटमध्ये जसा गुंतवणूकदारांचा विश्वासावर चालते तसे शिवसेनेचे आहे. तुमचा विश्वास कदापी तुटू देणार नाही, असे शिंदे म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

ससूनजवळील मोक्याच्या जागेवरून भाजप-शिंदे गट आमनेसामने येण्याची शक्यता

अंजली दमानिया यांचे पुन्हा अर्धवट ज्ञान आणि खोट्या आरोपांचे प्रदर्शन – Dhananjay Munde

मी धक्कापुरुष झालोय! उद्धव ठाकरेंचं मिश्किल वक्तव्य

Previous Post
'आम्ही भारतापेक्षा कमजोर...', मोठ्या सामन्यापूर्वी शाहिद आफ्रिदीचं विधान

‘आम्ही भारतापेक्षा कमजोर…’, मोठ्या सामन्यापूर्वी शाहिद आफ्रिदीचं विधान

Next Post
विधानसभा निवडणुकीत जनतेनेच धक्का देऊन कायमचे घरी बसवले, शिंदे यांची उबाठावर टीका

विधानसभा निवडणुकीत जनतेनेच धक्का देऊन कायमचे घरी बसवले, शिंदे यांची उबाठावर टीका

Related Posts
रेशीम कोषा

पुणे जिल्ह्यात वर्षभरात रेशीम कोषाचे २ लाख किलोपेक्षा अधिक उत्पादन

पुणे : जिल्ह्यात सन २०२२-२३ या वर्षात तुती लागवडीसाठी देण्यात आलेल्या २५० एकर लक्षांकापैकी २४१ एकर क्षेत्रावर २२६…
Read More
Sanjay Sharma, Ananya Sharma

इतिहास रचला : भारतीय हवाई दलात पहिल्यांदाच बाप-लेकीने जोडीने एकत्र विमान उडवले

बिदर : भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force) इतिहासात (History) आणखी एक नवीन अध्याय जोडला गेला आहे. भारतीय…
Read More
Chandrababu Naidu | सरकार स्थापनेपूर्वी एनडीएची डोकेदुखी वाढली, चंद्राबाबू नायडूंचा पक्ष टीडीपीने मागितली 6 मोठी मंत्रालये!

Chandrababu Naidu | सरकार स्थापनेपूर्वी एनडीएची डोकेदुखी वाढली, चंद्राबाबू नायडूंचा पक्ष टीडीपीने मागितली 6 मोठी मंत्रालये!

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीएमध्ये चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांच्या टीडीपी आणि नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्या जेडीयूचे महत्त्व खूपच…
Read More