जपानच्या ‘या’ रेस्टॉरंटमध्ये चक्क माकडे करतात नोकरी, कामाच्या बदल्यात पगारही मिळतो

Unique Restaurant In Japan: ज्यावेळी कठोर परिश्रमाचे उदाहरण दिले जाते तेव्हा जपानमधील लोकांचा उल्लेख नक्कीच होतो. पण तिथले फक्त माणसेच नाही तर प्राणीही खूप मेहनती आहेत असे जर आम्ही तुम्हाला सांगितले तर? (Japanese Culture) कदाचित तुम्हाला विश्वास ठेवणे थोडे कठीण जाईल, परंतु हे सत्य आहे. जपानमधील एका रेस्टॉरंटचा व्हिडिओ यूट्यूबवर (Japanese Restaurant) चांगलाच व्हायरल होत आहे. याबद्दल जाणून तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल…

जपानमधील काबुकी रेस्टॉरंट (Kabuki Restaurant In Japan) हे जगप्रसिद्ध रेस्टॉरंट (World Famous Restaurant) आहे. विचित्र रेस्टॉरंटच्या (Weird Restaurant) यादीत त्याचाही समावेश करण्यात आला आहे. वास्तविक, येथे दोन माकडांना वेटर म्हणून काम देण्यात आले आहे. या रेस्टॉरंटमध्ये (Monkey Waiter) वेटरचे पूर्ण काम हे माकड करते. या माकडांना पाहण्यासाठी आणि त्यांनी वाढलेले अन्न खाण्यासाठी लोक दूर दूरून येथे येतात.

जपानमधील टोकियो (Tokyo) येथे असलेल्या रेस्टॉरंटने माकडे किती बुद्धिमान असतात, हे सिद्ध केले आहे. जपानमध्ये प्राण्यांना काम करण्यास किंवा त्यांचे शोषण करण्यास सक्त मनाई आहे. त्या बदल्यात कठोर शिक्षेची (Weird Rules) तरतूद आहे. त्यामुळेच या रेस्टॉरंटच्या मालकाने सरकारची परवानगी घेऊन माकडे ठेवली आहेत. मात्र, त्यासाठी त्यांना आठवड्यातून केवळ २ दिवस माकडांना काम करण्याची परवानगी मिळाली आहे.

या रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर पाहुण्याचं स्वागत तिथे काम करणारे दोन माकड करतात. ते त्यांच्यासाठी मेनू कार्ड आणतात आणि त्यांच्या ऑर्डर देखील घेतात. यानंतर, माकडे अन्न सर्व्ह देखील (Monkey Waiter In Japan) करतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या माकडांनाही कार्यालयीन कर्मचाऱ्यांप्रमाणेच योग्य गणवेश परिधान करण्यात आला आहे. या कामाच्या बदल्यात माकडांना पगार (Monkey Salary) दिला जातो. पगार म्हणून त्यांना त्यांची आवडती केळी दिली जाते.