कृषी कायद्यांवर माघारीचे स्वागत; लोक जनशक्ति पार्टीने वाटले पेढे

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे परत घेण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय झाल्याने आम्ही स्वागत करीत आहोत, असे लोक जनशक्ती पार्टी पुणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट यांनी म्हटले आहे. काल सायंकाळी ४ वाजता साधू वासवानी चौकातील पक्ष कार्यालयात पेढे वाटून शेतकऱ्यांचा विजय साजरा करण्यात आला. हे कायदे संसदेत मागे घेतले गेले तरच त्याला अर्थ आहे. जर हे कायदे मागे घेतले नसते तर पुढील काळात गोरगरीब गरजुंचे रेशनवरील अन्नही गॅस प्रमाणे महाग झाले असते, असे आल्हाट यांनी सांगितले.

संजय आल्हाट (अध्यक्ष पुणे शहर जिल्हा), अमर पुणेकर (महाराष्ट्र प्रदेश सचिव), के. सी. पवार (पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस), आप्पा पाटील (संघटक), विनोद धिवार (सल्लागार), श्रीनाथ अडागळे (खडकवासला वि. मतदारसंघ) , बुद्धभूषण निकम (संघटक पुणे शहर), प्रकाश खंडागळे , शुभम आल्हाट (अध्यक्ष पुणे शहर युवक आघाडी), राहुल कुलकर्णी (उपाध्यक्ष पुणे शहर युवक आघाडी) , बंडू वाघमारे (पर्वती वि. मतदारसंघ संघटक), तय्यब शेख (संपर्कप्रमुख कसबा वि. मतदारसंघ) आदी मान्यवर उपस्थित होते.