मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी पॅनल स्थापन करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे स्वागत- महेश तपासे

मुंबई – मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि भारताचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी करावी असे महत्त्वाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले असून या निर्देशाचे स्वागत करत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) हा एक ऐतिहासिक निर्णय असून त्यामुळे लोकशाही आणखी मजबूत होईल, असे मत महेश तपासे यांनी व्यक्त केले आहे. संपूर्ण देश स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडे पाहतो आणि आता या नवीन निर्देशानंतर मतदार आणि राजकीय पक्ष पूर्णपणे आश्वस्त राहतील असेही महेश तपासे म्हणाले.