नॅशनल फिनस्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पश्चिम बंगालची सात सुवर्णपदकासह आघाडी

पुणे : अंडरवॉटर स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया (USFI) द्वारे आयोजित दुसऱ्या नॅशनल फिनस्विमिंग चॅम्पियनशिपला पुणे 2022 ला शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे – बालेवाडी येथे आज सुरूवात झाली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पश्चिम बंगालने सात सुवर्णपदकासह १२ पदके पटकावत आघाडी घेतली, तर केरळने एका सुवर्णपदकासह 8 पदके मिळवली.(West Bengal leads with seven gold medals on first day of National Finswimming Championship).

दुसऱ्या नॅशनल फिनस्विमिंग चॅम्पियनशिपला पुणे 2022 स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सुहास दिवसे (क्रीडा आयुक्त), सुभाष पाटील ( उप संचालक क्रिडा विभाग), यूएसएफआईचे जनरल सेक्रेटरी व द्रोणाचार्य पुरस्कार विजेते राष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. तपन पाणिग्रही, अचिंता पंडित (कोषाध्यक्ष USFI),रियर एडमिरल पीडी शर्मा (अध्यक्ष RLSS (I),गौरव भट्टाचार्य आदी उपस्थित होते

स्पर्धेच्या पहिल्या दिवसाच्या समारोपानंतर लाईफ सेव्हिंग स्पोर्टची प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली. यात विविध राज्यांतील जलतरणपटूनी वैविध्यपूर्ण कसरती सादर केल्या. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे स्पर्धेला शुभेच्छा दिल्या

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-
पुरुष 800 मीटर गटात प्रतीक पासी( छत्तीसगड) ला सुवर्णपदक, तर मॅचा राजू ( पाॅंडेचरी) रौप्य पदक, तर आकाश व्ही. एस (केरळ) कांस्य पदक, महिलांमध्ये द्विपन्विता मंडल (पश्मि बंगाल) सुवर्ण, सोहेली मंडल( पश्चिम बंगाल) रौप्य, प्रभालक्ष्मी डी (तामिळनाडू) कांस्य पदक पटकावले.

मुले (ज्युनिअर बी) 400 मीटर बीएन- फिन स्विमिंग गटात पौल आरम( केरळ) सुवर्णपदक), मानस मकड( गुजरात) रौप्य, प्रणित एस ( तामिळनाडू) कांस्य तर, मुलीमंध्ये ओलिविया बॅनर्जी( केरळ) सुवर्ण, नेहा सन्नाभाटी ९ पश्चिम बंगाल) रौप्य पदक, तर बानसुरी मकवाना (गुजरात) कांस्य पदक मिळाले.

मुले (ज्युनिअर सी) 200 मीटर बीएन- फिन स्विमिंग गटात अभिनव एस( केरळ) सुवर्ण पदक, ध्रुव टंक (गुजरात) रौप्य, तन्मय कौसल्या( तेलंगणा) कांस्य, तर मुलींमध्ये नादिया सैफ( केरला) सुवर्ण, अभिरामी पी.जे (केरळ) रौप्य, विहा जानी (गुजरात) कांस्य

मुले (ज्युनिअर डी) 200 मीटर बीआई- फिन स्विमिंग गटात जय जसवंत आर (तामिळनाडू) सुवर्ण, ईशांत (हरियाणा) रौप्य, त्रिदीप मंडल( पश्चिम बंगाल) कांस्य तर मुलींमध्ये रायमा चक्रवर्ती( पश्चिम बंगाल) सुवर्ण, श्रीजा साहा( पश्चिम बंगाल) रौप्य, तर निया पतंगे ( महाराष्ट्र) कांस्य,

मुले (ज्युनिअर ई) 200 मीटर बीआई- फिन स्विमिंग गट- श्रीशंक साहा( पश्चिम बंगाल) सुवर्ण, सचिनसात्विक सुरेशसरिता( तेलगंणा) रौप्य, तर विजयाशंकर पीव्ही( केरळ) कांस्य, मुलींमध्ये- सोहिनी दत्ता( पश्चिम बंगाल) सुवर्ण, सिल्मी हिबाह(पश्चिम बंगाल) कांस्य, व्यासघी के.एस. (केरळ) कांस्य पदक

200 मीटर बीआई फिन स्विमिंग (मास्टर व्हि ओ पुरुष गटात) ओमदत्त सिंग (उत्तराखंड) सुवर्णपदक, तर महिला गटात वेदनाथम भानुप्रिया ( आंधप्रदेश) सुवर्ण)

50 मीटर सरफेस मोनेफिन सीनिअर ए गटात पुरुषांमध्ये प्रल्हाद साहनी (उत्तरप्रदेश) सुवर्ण, चार्ल्स येन्नु( तेलगंणा) रौप्य, दीपक चौहान ( उत्तरप्रदेश)कांस्य, तर महिलांमध्ये सुनंदा दत्ता( पश्चिम बंगाल) सुवर्ण, साची ग्रामोपाध्ये ( गोवा) रौप्य, साग्रती मौर्या ( उत्तरप्रदेश) कांस्य,

50 मीटर सरफेस मोनेफिन ज्युनिअर बी- गट मुलांमध्ये दिबांका दास ( पश्चिम बंगाल) सुवर्ण, धनुष पी.जे (केरळ) रौप्य, जी. जैस (केरळ) कांस्य पदक तर मुलींमध्ये जिनल पित्रोदा( गुजरात) सुवर्ण, रिशीता दत्ता ( पश्चिम बंगाल), खुशी बेरा ( पश्चिम बंगाल) कांस्यपदक,

50 मीटर सरफेस मोनेफिन ज्युनिअर सी- गट पाथुरी भुवास- तेलगांना (सुवर्ण) विराट चौहान- उत्तरप्रदेश( रौप्य), तन्मय कौश्यल्या- तेलगांना ( कांस्य) तर मुलींमध्ये तनिशा मंडल- बंगाल ( सुवर्ण), प्रिशा टांक ( गुजरात) रौप्य, पवित्रा डी- तामिलनाडू( कांस्य)