कायरन पोलार्डची पत्नी आहे खूपच बोल्ड, बिजनेस वुमन म्हणून मिळवलंय भरपूर यश

इंडियन प्रीमियर लीगच्या २०२३ हंगामापूर्वी मुंबई इंडियन्समधून मोठी बातमी पुढे आली आहे. मंगळवारी (१५ नोव्हेंबर) मुंबई संघाचा अनुभवी अष्टपैलू कायरन पोलार्ड याने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर भावूक पोस्ट करत पोलार्डने निवृत्तीबद्दल माहिती दिली आहे. तसेच आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर पोलार्ड (Kieron Pollard) मुंबई संघाचा (Mumbai Indians) फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे.

पोलार्ड क्रिकेटबरोबरच त्याच्या लव्ह लाईफसाठीही प्रसिद्ध आहे. त्याची पत्नी जेना अली ही खूप सुंदर आहे. वेस्ट इंडिजचा लोकप्रिय अष्टपैलू खेळाडू पोलार्डने २०१२ मध्ये जेना अलीशी लग्नगाठ बांधली होती. ती एक बिजनेस वुमन आहे, जी त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये KJ Sports & Accessories Limited हा स्पोर्ट्स अॅक्सेसरीज ब्रँड चालवते. ती तिचा पती पोलार्डसोबत जगभरातील जवळपास प्रत्येक मोठ्या स्पर्धेला सोबत जाते.

पोलार्ड त्याची पत्नी जेना अलीला पहिल्यांदा एका सामन्यादरम्यान भेटला होता. त्यानंतर त्यांच्यात घट्ट मैत्री झाली आणि काही दिवसांनी त्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पोलार्डने जवळपास ७ वर्षे डेटिंग केल्यानंतर २५ ऑगस्ट २०१२ रोजी जेनाशी लग्न केले. लग्नापूर्वीच ते एका मुलाचे पालक झाले होते, ज्याचे नाव केडेन पोलार्ड होते.

https://www.instagram.com/reel/ChrDQ20KJV0/?utm_source=ig_web_copy_link

जेना अली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने शेअर केलेले फोटो चाहत्यांना खूप आवडतात आणि ती दिसायला खूप बोल्ड आणि सुंदर आहे.