शासनच्या माजी सैनिकांसाठी विविध कल्याणकारी योजना काय आहेत? 

माजी सैनिकांसाठी विविध कल्याणकारी योजना

योजनेचे स्वरुप
सैनिक कल्याण विभागाच्या कल्याणकारी निधीमधून  माजी सैनिक, विधवा आणि त्यांच्या आश्रितांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. विधवा, ६५ वर्षावरील माजी सैनिक यांना कोणतेही उत्पादनाचे साधन नसल्यास व अनाथ पाल्याच्या (२५ वर्षांपर्यंत) चरितार्थासाठी व माझी सैनिक व विधवांच्या मुलीच्या लग्नकार्यासाठी आर्थिक मदत देण्यात येते.

योजनेअंतर्गत आर्थिक लाभ
◆विधवा व ६५ वर्षावरील माजी सैनिक व अनाथ पाल्य यांच्या चरितार्थासाठी आर्थिक मदतीचे वित्तीय अधिकार –
१. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी :  ५०० रुपये एकरकमी
२. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष- २ हजार रुपये दरमहा एक वर्षासाठी किंवा एकरकमी २० हजार रुपये व ३.  संचालक, सैनिक कल्याण विभाग पुणे- ३ हजार रुपये  एक वर्षांसाठी किंवा एकरकमी ३० हजार रुपये.
◆माजी सैनिक दिवंगत झाल्यानंतर त्याच्या विधवा पत्नीस एक वर्षासाठी किंवा  कुटुंबनिवृत्ती वेतन सुरू होईपर्यंत  दरमहा २ हजार रुपये आर्थिक मदत मिळेल.

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा