महामंडलेश्वर कैलाशानंद यांच्या शिष्या मॉडेल हर्षा रिचारियाने (Harsha Richaria) शुक्रवारी संध्याकाळी वादांमुळे महाकुंभ सोडले आहे. सोशल मीडियावर सतत होत असलेल्या विधानांमुळे हर्षा खूप निराश झाली आहे. हर्षाने स्वत: सोशल मीडियावर रडतानाचा व्हिडिओ शेअर करत याबाबत घोषणा केली आहे.
तिने इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात व्हिडीओमध्ये ‘साध्वी’ हर्षा रिचारिया (Harsha Richaria) ढसाढसा रडत होती. महाकुंभ सोडण्याची घोषणा करतानाच, तिने रडत रडत ट्रोल करणाऱ्यांवर गंभीर आरोप केले.
‘एक मुलगी जी धर्माशी जोडली जाण्यासाठी, तो जाणून घेण्यासाठी इथे ( महाकुंभात) आली होती, सनातन संस्कृती जाणून घेण्याची इच्छा होती. मात्र तुम्ही (मला) त्यालायक ठेवलंच नाही की ती महाकुंभ संपेपर्यंत इथे राहू शकेल. हा महाकुंभ जीवनात एकदाच येतो, पण तुम्ही ती संधीच ( माझ्याकडून) हिरावून घेतली. ज्यांनी हे केलं असेलं त्यांना पाप लागेल’ , अशा शब्दांत तिने त्रागा व्यक्त केला.
साध्वी हर्षा म्हणाली, ‘काही लोकांनी मला धर्मात येण्याची संधी दिली नाही. या कॉटेजमध्ये राहून मी मोठा गुन्हा केलाय असं वाटतंय. माझा काहीही दोष नसतानाही मला टार्गेट केलं जातयं. याआधी मी महाकुंभ संपेपंर्यत इथे राहण्यासाठी आले होते, पण आता मला येथे राहता येणार नाही. या खोलीत 24 तास राहण्यापेक्षा मी येथून निघून गेलेलं बरं, अशा शब्दांत तिने संताप व्यक्त केला.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
भाजप सत्ताधारी आणि प्रशासनाने मिळून पुण्याची जागतिक नाचक्की करून दाखवली : Aam Aadmi Party
हिंदुत्वाचा अजेंडा नेण्यासाठी भाजप मंत्र्यांना संघाचे नेते कानमंत्र देणार
फडणवीसांनी करुणा शर्माला अनेकदा विमानाने माहेरी सोडलं | Trupti Desai