नाशिक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा शिर्डी दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शिर्डीत साईबाबांचं (Shirdi Saibaba) दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिन्नर तालुक्यातील इशानेश्वर मंदिरात गेले. तेथे अंकशास्त्राचे अभ्यासक अशोक खरात (Ashok Kharat) यांची त्यांनी भेट घेतली.
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले भविष्य जाणून घेतले, अशी अफवा उठवण्यात आली. इशानेश्वर मंदिराचे फोटो तर आहेत. पण भविष्य जाणून घेतले की नाही, याबाबत उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. यावर TV9 कडे सिन्नर येथील ज्योतिषी अशोक खरात यांनीच स्पष्टीकरण दिलंय.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केवळ ईशानेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते. ते भविष्य जाणून घेण्यासाठी आले नव्हते, असा खुलासा अशोक खरात यांनी केलाय.