Govt Scheme : घरकुलाचा लाभ मिळवून देणारी शबरी आवास योजना नेमकी काय आहे ?

अदिवासी उप योजनेंतर्गत अदिवासी क्षेत्रांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच अदिवासी बाह्य क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना कायमस्वरूपी घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी ही योजना आहे.

योजनेसाठी अटी

  • लाभार्थी निवडीचा अधिकार ग्रामसभेस देण्यात आला असून अंतिम निवड जिल्हास्तरीय समितीमार्फत करण्यात येते.
  • लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान पंधरा वर्षाचे असावे.
  • लाभार्थी हा बेघर असावा किंवा त्यांच्याकडे पक्के घर नसावे.
  • लाभार्थी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा १ लाख २० हजार रूपये आहे.
  • लाभार्थी सामाजिक,आर्थिक व जात सर्वेक्षण प्राधान्य क्रम यादीच्या निकषा बाहेरील असावा.

योजनेअंतर्गत लाभ

  • घरकुलासाठी प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान-१ लाख २० हजार रूपये, नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्रासाठी १ लाख ३० हजार.
  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ९० दिवसांचा  रोजगार  व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण शौचालय बांधकामासाठी १२ हजार रूपये अनुदान.
  • प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत लाभार्थ्यांस दिल जाणारे अनुदान पीएफएमएस प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. अधिक माहितीसाठी संपर्क: जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, पुणे.