उन्हाळ्यात सनस्क्रीन वापरल्याने नेमका काय फायदा होतो ?

पुणे – मार्च महिना चालू आहे आणि सूर्याची प्रखरता खूप वाढली आहे त्यामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे रक्षण करणे ही एक मोठी समस्या बनली आहे. तुम्हाला सकाळी ११-४ बाहेरची कामे निघाली तर त्वचेची काळजी घेणे हे खूप आवश्यक आहे. साधारणपणे आपण आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी जास्त पाणी पिणे, फ्रुट ज्यूस पिणे, कलिंगड, टरबूज सारखे जास्त पाण्याचे प्रमाण असलेले फळे खाणे,vitamin c असलेले लिंबू , संत्रा, मोसंबीचे ज्यूस व ताक पिणे हे सगळे उपाय आपण घरी करतच असतो पण आता global warming वाढत असल्यामुळे आपल्याला त्वचेची जास्त काळजी घेणे अत्यावश्यक झाले आहे.

बाहेर जाताना सनकोट, कॅप, गॉगल्, स्कार्फ हे सुद्धा घालणे आता आपल्याला आवश्यक बनले झाले आहे. पण या सगळ्या गोष्टींपेक्षा ही त्वचेची काळजी घेण्यासाठी आणखी काही या सर्वांपेक्षा ही जास्त महत्वाचे आहे. ते काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आम्ही ज्या गोष्टी बद्दल बोलत आहोत ते म्हणजे सनस्क्रीन. त्वचेची काळजी घेताना आणि सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपल्याला वाचवण्यासाठी सनस्क्रीन फार महत्वाची भूमिका बजावत असते.

उन्हाळा असो किंवा पावसाळा किव्हा थंडी कोणत्याही ऋतू मध्ये सनस्क्रीन हे आपण रोजच वापरणे आवश्यक आहे. कारण UV rays आपल्या त्वचेला सतत हानी पोहचवत असतात. तेलकट स्किनसाठी जेलबेस्ड, कॉम्बिनेशन स्किनसाठी लोशनबेस्ड आणि ड्राय स्किनसाठी क्रीम बेस्ड सनस्क्रीन वापरायला हवा.

आपण मॅक्सिमम protection मिळण्यासाठी नेहमी SPF ३० किव्हा त्यापेक्षा जास्त SPF असलेले सनस्क्रीन वापरायला हवे. त्यातही SPF ५० असलेले सनस्क्रीन हे सगळ्यात उत्तम.आपण घरातून बाहेर पडायच्या १५ मिन आगोदर सनस्क्रीन लावावे पण ही गोष्ट लक्षात ठेवा कि सूर्याची किरणं आपल्या घरातही येत असतात म्हणून घरी असताना सुद्धा आपण सनस्क्रीनचा आवश्यक वापर करावा.

सनस्क्रीन हे आपल्याला संरक्षण देते पण ते फक्त २-३ तासांसाठीच त्यामुळे ते प्रत्येक ३ तासाने पुन्हा लावणे खूप आवश्यक आहे.सनस्क्रीन वापरण्यासोबतच सनकोट, कॅप, गॉगल्स हे सुद्धा बाहेर पडताना वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या त्वचेला योग्य संरक्षण मिळेल.