अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरीता असणारी मार्जिन मनी योजना नेमकी आहे तरी काय ?

पालघर :- केंद्र शासनाने स्टँड अप इंडिया ही योजना सुरु केलेली असून या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 25% मार्जिन मनी भरण्याची क्षमता नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकातील होतकरु नवउद्योजक लाभार्थ्यांना मार्जिन मनी उपलब्ध करुन त्याला सक्षम बनविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या मार्जिन मनी योजना सुरु केलेली आहे.

या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउद्योजकांना 10% स्व-हिस्सा भरणा केल्यांनतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत 75% कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित Front and Subsidy 15% राज्य शासनामार्फत देण्यात येते.

तरी सदर योजनेचा लाभ घेणेकरीता व या योजनेसंबंधी अधिक माहितीकरीता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पालघर आफरीन अपार्टमेंट, बी-वींग, पहिला मजला, रुम नं.106, 107 रेल्वे फाटकाजवळ नवली, पालघर (पु.) येथिल कार्यालयाशी किंवा दुरध्वनी क्रमांक 025252-254277 वर संपर्क साधावा.