नाशिकमधील सिडकोचे कार्यालय स्थलांतर करण्यामागे हेतू नेमका काय? छगन भुजबळ यांचा सरकारला सवाल

नाशिक :- नाशिक मधील सिडकोचे (Sidko) कार्यालय हलवण्यामागे नेमका हेतू काय? असा सवाल उपस्थित करत राज्य शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करत नाशिकमध्ये सिडकोचे कार्यालय पूर्ववत सुरू ठेवावे. त्यासाठी आवश्यक अधिकारी आणि कर्मचारी देखील पूर्ववत कायम ठेवण्यात यावेत. यामध्ये स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

ते म्हणाले की, देशातील लोकशाही व्यवस्था टिकण्यासाठी न्याय व्यवस्थेची भूमिका अतिशय महत्वाची आहे. न्यायव्यवस्थेकडून येणाऱ्या चांगल्या निणर्यामुळे देशातील नागरिकांचा न्यायालयांवर विश्वास अधिक दृढ होत आहे. त्यामुळे आजही देशातील नागरिक न्यायाची अपेक्षा ही न्यायालयाकडून करतात असेही ते म्हणाले.