रावण आणि विभीषण यांच्यात शेवटचा नेमका काय संवाद झाला ?

राजा(King) रावणाचा(Ravan) दरबार भरला होता. शत्रू(enemy) सैन्याशी आता युद्ध(battle) अटळ होते. लंकेवर घोंगावत असलेल्या संकटाची आता जाणकार लोकांना चिंता लागली होती. राम आणि त्याच्या सोबत असणाऱ्या वानरांचा समूळ नयनाट करू असा मनात गर्व असताना सुद्धा केवळ औपचारिकता म्हणून लंकाधीशाने दरबारातील मंत्री आणि जेष्ठांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. राजाचा कल पाहून सेनापती आणि सर्वांनी रामासोबत युद्ध करून मोठा विजय मिळवू असा विश्वास व्यक्त केला.
सर्व मंत्री जेव्हा रावणाचे कौतुक करत चाटुगिरी करत होते तेव्हा संपूर्ण दरबारात केवळ माल्यवान आणि विभीषणाने राजा रावणाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. विभीषणाने प्रभू श्रीरामाची अनेक प्रकारे स्तुती करत, प्रभू श्रीरामाच्या आश्रयाला जाण्यातच सर्वांचे भले आहे असा रावणाला सल्ला दिला. विभीषण म्हणाला, राम दयाळू आहे आणि तुमचा अक्षम्य अपराध देखील क्षमा करू शकतो.

विभीषणाने रावणाला सांगितले की सीतेला रामाच्या स्वाधीन करण्यातच सर्वांचे भले आहे. हे ऐकून रावण क्रोधित झाला आणि त्याने विभीषणाचा पाणउतारा करण्यास सुरुवात केली. रावणाचा मुलगा इंद्रजित सुद्धा काकांवर धावून गेला. त्याने विभीषणाचा सर्वांसमोर अपमान करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्यावेळी रावण म्हणाला, हा सल्ला देताना तुला लाज कशी वाटली नाही. माझ्या पराक्रमावर तुझा विश्वास नाही का? सीतेला रामाच्या हवाली केल्यास ज्या ज्या ठिकाण वीरांची सभा भरेल त्या त्या ठिकाण रावण हा हसण्याचा विषय बनेल.भय हा शब्द रावणाच्या शब्दकोशात नाही. ते वनवासी आणि ती माकडं आमचं काहीच बिघडवू शकत नाहीत. तुझ्याशिवाय इतर कुणी दुसरा असता तर आता पर्यंत त्याचे शीर धडावेगळे केले असते. निघून जा माझ्या दरबारातून त्या वनवासी लोकांकडे आणि पुन्हा तुझे तोंडही दाखवू नको अशी आज्ञा रावणाने दिली.

विभीषण रावणाकडून होत असलेला अपमान सहन करत होता. रावणाने एवढा अपमान करून देखील जाताना विभीषण म्हणाला की तू माझ्यासाठी पित्यासारखा आहेस. तुम्ही मला शिव्या देऊ शकता, मला मारू शकता, परंतु तरीही मी तुम्हाला सांगेन की भगवान श्रीरामाची पूजा करणे तुमच्या हिताचे आहे. आपल्या कुळासाठी तसेच आपल्या राज्याच्या हिताच्या दृष्टीने देखील तेच योग्य आहे. अहंकार बरा नव्हे. चुकीचा सल्ला देत राजाच्या नाशाला कारणीभूत ठरणाऱ्या मंत्र्यांप्रमाणे मी वागू शकत नाही.आज जे जे मंत्री माझ्यावर हसत आहेत त्या सर्वांसह रावणा तुझ्या डोक्यावर सुद्धा मला मृत्यू घोंगावताना दिसत आहे. मी तुझी दरबारातून जाण्याची आज्ञा पालन करेन मी लंका सोडून जात आहे. मला धर्माचा त्याग करता येणार नाही असं म्हणून विभीषण पुढे निघाला. पुढे काय झालं ते सर्वांना ठाऊकच आहे.