Prakash Ambedkar | मणिपूर हिंसाचारात ‘सुपरपॉवर’चे काय झाले? प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला सवाल

Prakash Ambedkar | मणिपूर हिंसाचारात 'सुपरपॉवर'चे काय झाले? प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला सवाल

Prakash Ambedkar | मणिपूर हिंसाचारात ‘सुपरपॉवर’चे काय झाले? २००२ च्या गुजरात दंगलीत या ‘सुपरपॉवर’चे काय झाले? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहेत.

यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, जिनिव्हास्थित इंटरनल डिस्प्लेसमेंट मॉनिटरिंग सेंटरने (IDMC) मणिपूरमधील हिंसाचारानंतर सर्वाधिक विस्थापन झाल्याचे (67,000; 2023 मध्ये दक्षिण आशियातील एकूण विस्थापनांपैकी 97%) म्हटले असून  2018 पासून भारतातील संघर्ष आणि हिंसाचारामुळे देखील एवढे विस्थापन झाले नव्हते. कदाचित, तुम्ही ही “सुपरपॉवर” वापरली नसेल कारण, तुम्ही आणि तुमच्या गुंडांनी गुजरात आणि मणिपूरमधील हत्याकांडाला पाठबळ देऊन ते घडवून आणले.

आपल्याकडे खरोखरच इतकी प्रभावी “सुपरपॉवर” आहे, तर मग भारत आणि मालदीवमधील बिघडत चाललेले द्विपक्षीय संबंध वाचविण्यासाठी तुम्ही त्याचा वापर का केला नाही? चीनला आपली जमीन बळकावण्यापासून रोखण्यासाठी या “सुपरपॉवर”चा वापर का केला जात नाही? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, स्प्रींग रिव्हाॅल्यूशनला पाठिंबा देण्यासाठी आणि आपल्या शेजारील म्यानमारमध्ये 4000 हून अधिक निदर्शकांच्या हत्या थांबवण्यासाठी या “सुपरपॉवर”चा वापर का केला गेला नाही?इस्रायल-हमास यांच्यात शस्त्रसंधी आणि बंधकांच्या सुटकेसाठी वाटाघाटी करून हजारो जीव वाचवण्यासाठी तुम्ही सुपरपॉवरचा वापर का केला नाही?

इतना ज्यादा झूठ बोलने वाला आदमी देश तो क्या दुनिया में कोई नहीं हुआ होगा ! कोई नहीं, आप बोलते जाइए, हम लपेटते जाते हैं ! असे म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Prakash Ambedkar | घाटकोपर दुर्घटना मानवनिर्मित, मृत्यूला BMC जबाबदार; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

Prakash Ambedkar | घाटकोपर दुर्घटना मानवनिर्मित, मृत्यूला BMC जबाबदार; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

Next Post
Prakash Ambedkar | शरद पवार आणि उद्धव ठाकरे आपला सँडविच केल्याशिवाय राहणार नाहीत, प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन

Prakash Ambedkar | शरद पवार आणि उद्धव ठाकरे आपला सँडविच केल्याशिवाय राहणार नाहीत, प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन

Related Posts
मी मराठ्याचीच, वंजारीसारख्या सामान्य जातीला कशाला टार्गेट करता? वाल्मिकच्या पत्नीची प्रतिक्रिया

मी मराठ्याचीच, वंजारीसारख्या सामान्य जातीला कशाला टार्गेट करता? वाल्मिकच्या पत्नीची प्रतिक्रिया

Walmik Karad | संतोष देशमुख प्रकरणात ताब्यात असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या…
Read More
Jacqueline Fernandez Net Worth: जॅकलीनकडे कोट्यवधींची संपत्ती, कोट्यवधींचा बंगला, कार आणि बरंच काही 

Jacqueline Fernandez Net Worth: जॅकलीनकडे कोट्यवधींची संपत्ती, कोट्यवधींचा बंगला, कार आणि बरंच काही 

Jacqueline Fernandez Net Worth: मूळची श्रीलंकेची असलेल्या जॅकलीनने बॉलिवूड आणि भारतीय चित्रपटसृष्टीत खूप नाव कमावले आहे. तिने सुमारे 14…
Read More
suresh raina

चिन्ना थला सुरेश रैनाला खास व्हिडीओ मधून CSK चा अखेरचा निरोप

मुंबई : आयपीएल 2022 मेगा लिलावात अनेक आश्चर्यचकित गोष्टी पाहिल्या मिळाल्या. यापैकी एक म्हणजे मिस्टर आयपीएल म्हणून ओळख…
Read More