असं काय झालंय? ज्यामुळे अभिषेक बच्चन होणार कॉन्ट्रॅक्ट किलर

मुंबई : अभिषेक बच्चन हा सध्या मोठ्या पडद्यावर जास्त दिसत नाही. त्याचा बिग बुल झळकल्यानंतर तो तसा मोठ्या पडद्यापासून दूरच राहिला आहे. पण, आता पुन्हा एकदा अभिषेकच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

कारण, त्याच्या एका आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात त्याचा लुक खूप वेगळा दिसून येत आहे. चपटे केस, मोठ्या फ्रेमचा चष्मा अशा अवतारात अभिषेक झळकत आहे.

या चित्रपटाचं नाव आहे बॉब बिस्वास. 2012साली विद्या बालन अभिनित कहानी या चित्रपटात बॉब बिस्वास नावाची एक व्यक्तिरेखा होती. भाडोत्री मारेकरी असलेला बॉब दुहेरी आयुष्य जगत असतो, असं त्यात दाखवण्यात आलं होतं. शाश्वत चॅटर्जी या अभिनेत्याने ती भूमिका केली होती. ती भूमिका छोटी असली तरी त्या भूमिकेचं कौतुक झालं होतं.

त्यामुळे याच व्यक्तिरेखेवर आधारित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात अभिषेक बॉबच्या भूमिकेत दिसणार आहे. रेड चिलीज एन्टरटेन्मेंटने या चित्रपटाची निर्मिती केली असून दिव्या अनुपमा घोष या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट 3 डिसेंबर रोजी झी5 वर झळकणार आहे.

https://youtu.be/3AmlxDP4tcU

You May Also Like