रेव्ह पार्टी म्हणजे काय? श्रीमंत घरातील तरुणांमध्ये का वाढत आहे आकर्षण

मुंबई –  असे म्हणतात की रेव्ह पार्ट्या सामान्यतः महानगरांतील हॉटेल्स आणि मोठ्या शहरांशी जोडलेल्या भागातील फार्म हाऊसमध्ये (Farm House) आयोजित केल्या जातात. ज्यामध्ये तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. सहसा ते मोठ्या आणि श्रीमंत घरांचे असतात. या एका रात्रीच्या पार्टीत लाखो रुपयांची उधळपट्टी होते. येथे जे तरुण-तरुणी येतात, ते महागड्या वाहनांनी येतात.त्यांच्यात मुलींचीही उपस्थिती असते.

जयपूर, लखनौ, बंगळुरूसारख्या शहरांमध्येही आता दिल्ली-मुंबईप्रमाणे रेव्ह पार्ट्या वाढल्या आहेत. या पार्ट्यांमध्ये दोन खास प्रकारची ड्रग्ज (Drugs) जास्त असते. जे घेतल्यानंतर तरुण सहा ते आठ तास डान्स करू शकतात. रेव्ह पार्टी म्हणजे दारू, ड्रग्ज, संगीत, नृत्य आणि सेक्स यांचे कॉकटेल. हे अत्यंत गुप्त पद्धतीने केले जातात.

व्हॉट्सअॅपद्वारे (Whatsapp)  गुप्त गट तयार करून लोकांना यामध्ये बोलावले जाते. ज्यांना बोलावले जाते, ते मंडळाबाहेरच्या लोकांना सुगावाही लागू देत नाहीत. नोएडामध्ये (Noida) रंगलेल्या रेव्ह पार्टीमध्ये लोकांचे मनोरंजन करण्यासाठी अनेक मुलींना एस्कॉर्ट एजन्सीद्वारे (Escort agency) बोलावण्यात आले होते.