लखनऊचे प्रसिद्ध ‘पलंगतोड पान’, खरंच हे पान खाल्याने सुहागरातीला मोडतो का बेड?

आपल्या देशात पान खाणे ही एक सामान्य गोष्ट आहे. लग्नाच्या मिरवणुकांचे स्वागत असो किंवा पूजा असो, प्रत्येक ठिकाणी पानाचा वापर केला जातो. पान खायला थोडे तुरट असते, पण जे लोक पान खातात ते सुपारी, काथ, चुना आणि इतर अनेक गोष्टी मिसळून पान खातात. सहसा लोक पान खाण्याची सवय चुकीची मानतात, पण सगळ्यांप्रमाणेच याचेही काही फायदे आहेत. पान खाल्याने लैंगिक उत्तेजना वाढवतात. हेच कारण आहे की काही जोडपी जिव्हाळ्याचे क्षण अधिक आनंददायी करण्यासाठी पान खातात.

आयुर्वेदानुसार पान जेवणानंतर आणि सहवासाच्या आधी खाऊ शकतो. पान पचनक्रिया सुधारण्यास उपयुक्त आहे. हे श्वासाची दुर्गंधी दूर करते आणि त्यात काही पदार्थ असतात जे कामवासना वाढवण्यास योगदान देतात. काही वेळा पानाचा लाल रंग काही लोकांचे आकर्षण वाढवू शकतो. लखनऊ शहरात तर लैंगिक उत्तेजना वाढवण्यासाठी जोडपे ‘पलंगतोड’ पान (Palangtod Paan) खातात. पलंगतोड पान म्हणजे काय आणि ते कसे तयार केले जाते? ते जाणून घेऊया.

पलंगतोड पान काय आहे?
लखनऊ शहरात प्रसिद्ध असलेल्या अझहर भाई पानवाले यांच्या दुकानात एकापेक्षा एक नमुन्याचे पान मिळतात. हे दुकान ८० वर्षे जुने असून येथे पलंगतोड पान, सुहागरात पान, कमरदर्द पान, पीठ दर्द पान, बेगम पसंद पान अशा पानाच्या अनेक हटके व्हरायची मिळतात.

दिल्लीतील पान विक्रेते दिलशाद खान सांगतात, ‘पलंगतोड पान’ याला ‘हनीमून पान’ (Honeymoon Paan) म्हणूनही ओळखले जाते. हे लैंगिक उत्तेजना वाढवण्यासाठी ओळखले जाते. ते सोन्याच्या फॉइलमध्ये गुंडाळले जाते आणि एका जोडीमध्ये विकले जाते. हे अप्रतिम सुगंधी पान एका आकर्षक बॉक्समध्ये ठेवण्यात येते. पुरुषांसाठी बनवलेल्या या खास पानात सुगंधी केल्प (अगर) रस, गुलाब, काश्मिरी केशर आणि कलकत्ता सुपारीच्या पानात गुंडाळलेले काही घटक असतात, तर महिलांसाठी बनवलेल्या पलंगतोड पानात पांढरी मुसळी, केशर आणि गुलाब यांसारख्या घटकांचा समावेश आहे. असे मानले जाते की हे पान खाल्ल्यानंतर सुगंधी श्वास येतो.

‘पलंगतोड पान’ खरच पलंग मोडू शकतो का?
दिल्लीचे प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट विनोद रैना यांच्या म्हणण्यानुसार, अनेक लोक हनीमूनमध्ये पलंगतोड पानाचे सेवन करतात. या हेतूने की सहवासाच्या वेळी शक्ती येईल. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, त्यामध्ये औषधे मिसळली जातात, ज्याच्या वापराने एकतर मनुष्य संभोगाच्या आधी झोपतो किंवा नशेमुळे अर्धा किंवा एक मिनिटाचा कालावधी तासांसारखा वाटतो. महागडे पलंगतोड पान फायदेशीर आहे, पण खाणाऱ्याला नाही तर फक्त विक्रेत्यालाच.