Govt Scheme : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना नेमकी काय आहे ?

योजनेचे स्वरूप

योजनेंतर्गत उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील शासकीय, अशासकीय अनुदानित,अंशत: अनुदानित (टप्पा अनुदान- विना अनुदान) तसेच कायम विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये व अकृषी विद्यापीठे व त्या विद्यापीठा अंतर्गत असलेल्या उपकेंद्रामधील (खाजगी अभिमत विद्यापीठे तसेच स्वयं अर्थसहाय्यीत खाजगी विद्यापीठे वगळून) व्यावसायीक व बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरीता शिष्यवृत्तीचा लाभ देय आहे.

योजनेच्या अटी

  • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. तथापि महाराष्ट्र – कर्नाटक राज्य सीमा भागातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • अर्जदाराच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • डीएचई अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.
  • अर्जदाराने इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • या योजनेचा लाभ दूरस्थ पध्दतीने अथवा अर्धवेळ स्वरुपात चालविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही.
  • योजनेच्या लाभासाठी अनुज्ञेय असलेला अभ्यासक्रम सुरु करण्यास शासनाची व संबंधित सक्षम संस्थाची पूर्व मान्यता व संलग्नता आवश्यक आहे.
  • अर्जदार विद्यार्थ्यास प्रत्येक सत्र अथवा वर्षाची परीक्षा देणे आवश्यक राहिल.
  • मागील वर्षी सदर शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेले विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या नूतनीकरणासाठी अर्ज करू शकतात.
  • नवीन मंजुरी तसेच नुतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज आवश्यक तसेच www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा.

संपर्क : शिक्षण संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे

www.dhepune.gov.in