Sharad Pawar : वंचित बहुजन आघाडीने ट्विट करत म्हटले आहे की, शरद पवार, महाराष्ट्रातील राज्य सरकार मोठ्या प्रयत्नाने 2 महिन्यांचे आहे. मनोज जरांगे यांची जी मागणी आहे की, मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातून द्या. यावर आपली आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांची काय भूमिका आहे? ती स्पष्ट करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले आहे.
श्री. शरद पवार, महाराष्ट्रातील राज्य सरकारचा कालावधी 2 महिने उरला आहे!!!
मनोज जरांगे यांची जी मागणी आहे की, मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातून द्या. यावर आपली आणि @NCPspeaks यांची काय भूमिका आहे?
ती स्पष्ट करावी! pic.twitter.com/tGMi84U1fO
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) July 20, 2024
आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांना मुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी काय शब्द दिले आहेत, ते जाहीर करावे असे आवाहन शरद पवार यांनी केले होते. यावरून वंचित बहुजन आघाडीने शरद पवार यांना भूमिका स्पष्ट करण्याबाबत आवाहन केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
Nana Patole | काँग्रेस पक्ष महाराष्ट्राचा स्वाभिमान राखणार, राज्याला गुजरातचा गुलाम होऊ देणार नाही
Suryakumar Yadav | सूर्यकुमार यादवला टी20 संघाचा कर्णधार बनणं पडलं महागात! वनडेतून झाला बाहेर