मुकेश अंबानींच्या शेफला दिल्लीच्या आमदारांपेक्षाही मिळतो दुप्पट पगार, सोबतच मिळतात ‘या’ सुविधा

जगातील अब्जाधीशांमध्ये महत्त्वाचे स्थान असलेले मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे, परंतु अंबानींच्या स्टाफबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी आपल्या कर्मचाऱ्यांची खूप काळजी घेतात. ते आपल्या कर्मचाऱ्यांना चांगल्या पगारासह अनेक सुविधाही देतात. आता एका रिपोर्टनुसार मुकेश अंबानींच्या शेफचा पगार समोर आला आहे. मुकेश अंबानींचा शेफ (Mukesh Ambani Chef Salary) एका आमदारांपेक्षाही जास्त कमावतो.

माध्यमातील वृत्तानुसार, मुकेश अंबानी यांच्या शेफचा पगार महिन्याला 2 लाख रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्लीतील आमदारांचा पगार दरमहा 90,000 रुपये आहे. अशा परिस्थितीत मुकेश अंबानींच्या शेफची कमाई आमदारांपेक्षा जास्त आहे. रिपोर्टनुसार, अंबानींच्या बहुतांश कर्मचाऱ्यांचा पगार सारखाच आहे. त्याचबरोबर अंबानींच्या काही कर्मचाऱ्यांची मुलेही परदेशात शिकत आहेत. ज्यांची मुले अभ्यासात चांगली आहेत अशा कर्मचाऱ्यांमध्ये सहभागी असलेल्या लोकांनाही अंबानी मदत करतात.

रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांना साधे जेवण खायला आवडते. अंबानी हे शाकाहारी आहेत. साधे अन्न खाण्याचा दिनक्रम अंबानींचा फार पूर्वीपासून आहे. मुकेश अंबानी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत शिकत असल्यापासून साधे जेवण पसंत करतात. अँटिलियामध्ये काम करणाऱ्या जवळपास प्रत्येक कर्मचाऱ्याला चांगला पगार मिळत आहे. चांगल्या पगाराशिवाय अंबानीच्या कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या सुविधाही मिळतात. मुकेश अंबानी आपल्या कर्मचाऱ्यांना पगार तसेच विमा आणि शिक्षण भत्ता देतात. मुकेश अंबानीचा ड्रायव्हर किंवा शेफ बनवणे सोपे नाही. त्यासाठी अनेक प्रकारचे निकष पूर्ण करावे लागतात.