मुस्लिम शुक्रवारी बॉम्बस्फोट करू शकत नाहीत या सारखी फालतू विधाने करणाऱ्यांकडून आणखी काय अपेक्षा केली जाऊ शकते?

पुणे – बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (vivek Agnihotri) यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files)या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, एका बाजूला ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या सिनेमावरून काही वाद देखील निर्माण होताना पाहायला मिळत आहेत. यातच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही या सिनेमावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी भाजपावर अशा प्रकारच्या चित्रपटाचा आधार घेऊन देशातलं वातावरण विषारी केल्याचा आरोप केला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी देण्याची गरज नव्हती असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आता याच मुद्द्यावरून भाजयुमोचे प्रदीप गावडे यांनी पवारांना लक्ष्य केले आहे. ते म्हणाले, इस्लामी दहशतवाद्यांना क्लीन चिट देण्यासाठी मस्जिद बंदर येथे न झालेला बॉम्बस्फोट शोधून काढणाऱ्या व मुस्लिम शुक्रवारी बॉम्बस्फोट करू शकत नाहीत सारखी फालतू विधाने करणाऱ्यांकडून आणखी काय अपेक्षा केली जाऊ शकते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.