बाबरी पाडली तेव्हा संजय राऊत काय करत होते ? नितेश राणेंनी पुराव्यांसह केली पोलखोल 

मुंबई – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी भाजपच्या महापोलखोल सभेत बोलत असताना ‘बाबरी मशीद पाडली तेव्हा शिवसेनेचा एकही नेता तिथे नव्हता’, असे वक्तव्य केले. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी तीव्र शब्दांत टीका केली. मात्र त्याच्या काही तासांतच भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी संजय राऊत कसे याआधी राम मंदिराच्या विरोधात होते, याचे सप्रमाण पुरावे देत त्यांनी उघडे पाडले.

संजय राऊत यांनी बाबरी मशीदवर बोलणे म्हणजे हलकटपणाचा कळस आहे.  जेव्हा बाबरी मशीद तोडली तेव्हा तुम्ही सामनाचा पगार तरी घेत होता का?  तेव्हा तुम्ही लोकप्रभामध्ये लिहीत होता. संजय राऊत यांनी रामाची राजकीय फरफट असे आर्टिकल लिहिलं आणि तोच संजय राऊत बोलत असेल तर हा हलकटपणाचा कळस आहे, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे.

आमच्या माहितीनुसार तेव्हा तुम्ही लोकप्रभामध्ये लिहायचे. माझ्या हातामध्ये संजय राऊत यांनी लिहिलेली २६ एप्रिल १९९२चा एक लेख आहे. ज्यामध्ये त्यांनी रामाची राजकीय फरफट नावाचा लेख लिहिला आहे. तसेच त्यांनी राम मंदिराच्या विरोधात हा लेख लिहिला आहे. आता तेच संजय राऊत तोंड उघडून जर बोलणार असतील तर, खरंच हे हलकटपणाचं कळस आहे, असं नितेश राणे म्हणाले.