हॉटेल बदलल्यावर मनस्थिती बदलत नसते, माणसं बदलतात असंही नाही – शेलार 

मुंबई –  विधान परिषदेच्या (Legislative Council) दहा जागांसाठी येत्या 20 तारखेला मतदान होणार असून यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. राज्यसभा निवडणुकीत केलेल्या दमदार कामगिरीमुळे भाजपचा (BJP) आत्मविश्वास वाढला आहे तर त्या निवडणुकीत पराभव झाल्याने महाविकास आघाडीत (MVA) अविश्वासाचे वातावरण आहे.

दरम्यान,  विधानपरिषद निवडणुकीत सर्वांत मोठा मुद्दा गुप्त मतदानाचा आहे. राज्यसभेत खुलं मतदान असल्याने पक्षाच्या आमदारांना मत दाखवून टाकावं लागलं. पण विधान परिषदेत आमदार गुप्त मतदान (Secret ballot) करतील. त्यामुळे क्रॅास वोटिंग (Cross Voating) होण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडी एकत्र दिसत असली तरी या तिन्ही पक्षात अंतर्गत मतभेद आहेत. काँग्रेसने (Congress) अनेकवेळा मुख्यमंत्री भेटत नाहीत अशी उघडपणे तक्रार केलीये. तर, शिवसेना आमदारही खासगीत उद्धव ठाकरे भेटत नसल्याचं बोलून दाखवत असल्याचं दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपने आपापल्या आमदारांना मुंबईत बोलावलं आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Chief Minister and Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांनी पक्षाच्या सर्व आमदारांना पुन्हा मुंबईत बोलावलं आहे. 18 तारखेला मुंबईतल्या पवईमधील रेडियन्स हॉटेलमध्ये (Radiance Hotel) शिवसेना आमदार उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपल्या आमदारांना मुंबईत दोन दिवसात पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व आमदारांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलं जाईल. तर दुसरीकडे भाजपने देखील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व आमदारांना 18 जून रोजी मुंबईत बोलावलं आहे. मुंबईत ताज प्रेसिडन्सी हॉटेलमध्ये(Taj Presidency Hotel) या आमदारांचा मुक्काम असेल.

या घडामोडींवर भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar)  म्हणाले,महाविकास आघाडीचा निकाल राज्‍यसभेत जसा लागला तसाचं विधान परिषदेच्या निवडणुकीत लागेल. हॉटेल बदलल्यावर मनस्थिती बदलत नसते. माणसं बदलतात असंही नाही. भाजप कुठल्याही आव्हानाला तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.