…जेव्हा दारा सिंगने २०० किलो वजनाच्या ऑस्ट्रेलियन पैलवानाला उचलून रिंगच्या बाहेर फेकला होता

मुंबई – दिवंगत बॉलीवूड अभिनेते  दारा सिंग  चित्रपटात येण्यापूर्वी भारतातील प्रसिद्ध कुस्तीपटू होते. दारा सिंग हे अभिनयासोबतच कुस्ती स्पर्धांमध्येही तो भाग घेत होते. दारा सिंगने आपल्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत जवळपास ५०० सामने लढले आणि यापैकी एकाही सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला नाही.

दारा सिंह यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1928 रोजी पंजाबमधील धरमुचक येथे झाला. वयाच्या 20 व्या वर्षी, 1947 मध्ये, ते व्यावसायिक कुस्तीचे प्रशिक्षण घेण्यासाठी सिंगापूरला गेले. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांची उंची 6 फूट 2 इंच आणि वजन सुमारे 127 किलो होते. सिंगापूरच्या ‘ग्रेट वर्ल्ड स्टेडियम’चे प्रशिक्षक हरनाम सिंग यांच्याकडे त्याने कुस्तीचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि एका गिरणीत कामही सुरू केले. यादरम्यान प्रशिक्षक हरनाम सिंग यांनी दारा सिंग यांना भारतीय शैलीत प्रशिक्षण दिले.

प्रशिक्षक हरनाम सिंग यांच्याकडून काही वर्षे प्रशिक्षण घेतल्यानंतर कुस्तीपटू दारा सिंगने व्यावसायिक कुस्तीला सुरुवात केली . 1959 मध्ये तो पहिला  ‘कॉमनवेल्थ चॅम्पियन’  बनले. यानंतर त्यांनी ‘बिल वेर्ना’, ‘फिरपो झाबिस्को’, ‘जॉन दा सिल्वा’, ‘रिकिडोझान’, ‘डॅनी लिंच’ आणि ‘स्की हाय ली’ यांसारख्या बलाढ्य कुस्तीपटूंना पराभूत करून जगभरात भारतीय कुस्तीचा डंका वाजवला.

दारा सिंगने 60 ते 80 च्या दशकात जगातील  अनेक मोठ्या कुस्तीपटूंना पराभूत केले. यापैकी एक जगातील सर्वात धोकादायक कुस्तीपटू किंग काँग देखील होता . ‘दारा सिंग’ आणि ‘किंग काँग’मधला जबरदस्त सामना आजही अनेकांच्या लक्षात आहे. यादरम्यान दारा सिंगने सुमारे २०० किलो वजनाचा ऑस्ट्रेलियन ‘किंग काँग’ उचलून रिंगच्या बाहेर फेकला. आजही हा कुस्ती इतिहासातील सर्वात रोमांचक सामन्यांपैकी एक मानला जातो.

दारा सिंगने आपल्या कुस्ती कौशल्यासाठी ‘रुस्तम-ए-पंजाब’ आणि ‘रुस्तम-ए-हिंद’ ही पदवीही  मिळवली. दारा सिंह यांनी 60 च्या दशकात कुस्तीसोबतच फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. या काळात त्यांनी ‘किंग काँग’ आणि ‘फौलाद’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. यानंतर 80 च्या दशकात रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत ‘हनुमान’ ही व्यक्तिरेखा साकारून तो घरोघरी पोहचले. यानंतरही दारा सिंह यांनी शेकडो चित्रपटांमध्ये काम केले.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

शेकडो देशांमध्ये 90 प्रकारच्या फ्लेवर्समध्ये उपलब्ध असणाऱ्या फॅन्टाचा शोध कसा आणि केव्हा लागला

Next Post

‘बाबरच्या काळापूर्वी भारतातील प्रत्येकजण हिंदू होता’

Related Posts
भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवचा 'आधारस्तंभ' हरपला, वडिलांचे ७४व्या वर्षी निधन

भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवचा ‘आधारस्तंभ’ हरपला, वडिलांचे ७४व्या वर्षी निधन

भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) याच्याशी संबंधित एक दु:खद बातमी समोर येत आहे. उमेश यादव याचे…
Read More
sharad pawar

‘शरद पवार हे कधीच कुणाशी विश्वासाने वागले नाहीत, जे त्यांच्याबरोबर गेले त्यांचे त्यांनी वाटोळेच केले’ 

खटाव : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी टीकास्त्र सोडले आहे.पवारांनी अनेकांचा विश्वासघात…
Read More
nana

मी तिथे पंतप्रधान मोदींबद्दल नाही,तर मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोलत होतो; पटोलेंची सारवासारव

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याचं एक बेताल वक्तव्य समोर आले आहे. या व्हिडीओमध्ये ते मारण्याची आणि…
Read More