एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच आनंद दिघेंच्या पुतण्याने केली ‘ही’ मोठी मागणी

मुंबई – महाराष्ट्रात इतक्या दिवसांच्या राजकीय उलथापालथीनंतर अखेर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री करण्यात आले.  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारतील, अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सुरुवातीला या सरकारमध्ये फडणवीस सहभागी न झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते मात्र वरिष्ठ  नेतृत्वाच्या आदेशानुसार फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली आहे.

दरम्यान, आनंद दिघे (Aanand Dighe) यांचे पुतणे केदार दिघे (Kedar Dighe) यांनी फेसबुक पोस्ट करत शिंदेंना मोठी मागणी केली आहे. आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांनी विधीमंडळात मंजुर केलेल्या शक्ती विधेयकास राष्ट्रपतींकडुन मान्यता (Shakti Bill approved by the President) व मराठी भाषेला अभिजात दर्जासाठी (Classical status of Marathi language) प्रयत्न करावा ही अपेक्षा. अशी मोठी मागणी केली आहे.