मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती

नवी दिल्ली – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis) दिल्ली दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांची भेट घेतली. तसंच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Rajnath Singh and President Ramnath Kovind) यांची भेट घेतली. यानंतर पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळ विस्ताराविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी अधिवेशनाच्या आधी विस्तार होईल असं म्हटलं आहे.

उद्या आषाढी एकादशी झाली की मी आणि देवेंद्र फडणवीस मुंबईत भेटून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करु. त्यानंतर आपल्या मनातील प्रश्नाचं उत्तर लवकरच देऊ. अधिवेशनाआधी मंत्र्यांचा शपथविधी होईल, असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. अमित शाह यांच्यासोबत काल झालेली भेट ही सदिच्छ भेट होती. अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आमंचं बंड नव्हे, आमची पक्षातील क्रांती आहे. बंड केलेले आमदार पैशांच्य मागे आलेले नाहीत. 50 खोके कसले? मिळाईचे का? पैसे घेतल्याच्या आरापोला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. सभागृहात तोंड दाबून मुक्क्यांचा मार खात होतो. सभागृहात सावरकरांविषयी बोलू शकत नव्हतो, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.