पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या 80 वर्षाच्या आजीच्या घरी कधी जाणार? देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

औरंगाबाद : ‘झुकेगा नही’ असं म्हणणाऱ्या 80 वर्षाच्या आजीच्या घरी मुख्यमंत्री गेले, पण पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या (BJP Jal Aakrosh Morcha) 80 वर्षाच्या आजीच्या घरी मुख्यमंत्री कधी जाणार असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी केला आहे. औरंगाबादच्या पाण्याचा सत्यानाश जर कोणी केला आहे तर तो शिवसेनेने केला आहे असा आरोपही त्यांनी केला. संभाजीनगरमध्ये पाणी पोहोचल्याशिवाय सत्ताधाऱ्यांना स्वस्थ झोपू देणार नाही असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

पाणी प्रश्नावरून औरंगाबाद शहरातील राजकारण चांगलंच तापलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपकडून जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो भाजप कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले. रिकाम्या घागरी, हंडे हातात घेऊन महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेविरोधात (Shivsena)जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी बोलताना ते म्हणाले, ज्यावेळी सात सात दिवस नळातून केवळ हवा येते. त्यावेळी माझी माय माऊली मनात तुम्हाला शिव्या शाप देतेय. ते शिव्या शाप तुम्हाला डुबवू शकत नाहीत. आज तर ऐंशी वर्षाची आजी हंडा घेऊन मोर्चात होती. माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, जी आजी त्यांच्या घरासमोर आंदोलनात सहभागी झाली होती. त्या म्हणाल्या, झुकेगा नाही साला म्हणून तुम्ही तिच्या घरी गेलात. पण या हंडा घेऊन पाणी (water) मागणाऱ्या आजीच्या घरी तुम्ही कधी जाणार आहात? तिच्या व्यथा तुम्ही कधी समजून घेणार आहात?