भारतीय सैन्यात महिलांचे (Indian Army) योगदान सातत्याने वाढत असून, त्यांच्या सहभागाने देशाच्या सशस्त्र दलाला एक वेगळी ओळख मिळत आहे. युद्धभूमीपासून ते लढाऊ विमानांच्या कॉकपिटपर्यंत आणि तोफखान्याच्या तोफा सांभाळण्यापर्यंत महिलांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. आज आपण सैन्यातील महिलांच्या या ऐतिहासिक योगदानावर एक दृष्टिक्षेप टाकूया.
भारतीय सैन्याची (Indian Army) स्थापना 1 एप्रिल 1895 रोजी ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने केली. स्वातंत्र्यानंतर भारतीय सैन्याला पहिले भारतीय प्रमुख जनरल के. एम. करिअप्पा 15 जानेवारी 1949 रोजी मिळाले. तो दिवस आजही सैन्य दिवस म्हणून साजरा केला जातो. सुरुवातीच्या काळात सैन्यात महिलांचा सहभाग मर्यादित होता. मात्र, 1992 पासून शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे महिलांना सैन्यात सामावून घेण्यास सुरुवात झाली.
1992 मध्ये महिला शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत सैन्यात सामील झाल्या. 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महिलांना स्थायी कमिशनसाठी परवानगी देण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे महिलांना सैन्याच्या उच्च पदांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली. 2021 मध्ये महिलांसाठी स्थायी कमिशन लागू करण्यात आले. यामुळे महिलांना सैन्याच्या विविध विभागांमध्ये प्रवेश मिळाला. आर्मी मेडिकल कोर, आर्मी डेंटल कोर, आणि मिलिटरी नर्सिंग सेवांबरोबरच 11 प्रमुख विभागांत महिलांना संधी दिली गेली. यामध्ये आर्मी सर्व्हिस कोर, आर्मी ऑर्डनन्स कोर, सिग्नल्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल कोर, इंटेलिजन्स कोर, आर्मी एव्हिएशन, आर्मी एअर डिफेन्स यांसारख्या विभागांचा समावेश आहे.
2023 मध्ये महिलांना आर्टिलरी विभागात सामील करून तोफखान्याच्या महत्वपूर्ण भूमिकांवर काम करण्याची परवानगी देण्यात आली. यामध्ये बोफोर्स, होवित्झर, आणि के-9 वज्र तोफा हाताळण्याचे कौशल्य महिलांनी सिद्ध केले आहे. महिला उमेदवारांसाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) प्रवेश 2021 मध्ये खुला करण्यात आला. 2022 मध्ये महिला कैडेट्सच्या पहिल्या बॅचने प्रशिक्षण घेतले. एनडीएत दर सहा महिन्यांनी 19 महिला कैडेट्सची भरती केली जाते, त्यापैकी 10 कैडेट्स भारतीय सैन्यासाठी असतात.
भारतीय हवाई दलाने 2015 मध्ये महिलांना लढाऊ पायलट म्हणून सामावून घेतले. नेव्हीने 2021 मध्ये महिला अधिकाऱ्यांना युद्धनौकांवर तैनात केले. यामुळे महिलांचा सहभाग जल आणि हवाई मार्गांवरही वाढत आहे.2023 च्या अहवालानुसार, भारतीय सैन्यात 7,093 महिला कार्यरत आहेत. यामध्ये 6,993 महिला अधिकारी आहेत, तर 100 महिला इतर श्रेणींमध्ये कार्यरत आहेत. महिलांना पुरुषांप्रमाणेच सर्व सुविधा दिल्या जातात, जसे की पगार, पदोन्नती, निवासस्थान, आणि विशेषतः मातृत्व रजा व बाल संगोपन रजा यांसारख्या सुविधा.
भारतीय सैन्यात महिलांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्या या ऐतिहासिक प्रवासाने सैन्य अधिक सशक्त बनले आहे. डेटा सेंटर्स, तोफखाना, लढाऊ विमान, आणि युद्धनौकांवरील तैनाती यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी आपली छाप पाडली आहे. महिलांना सैन्यात सामावून घेतल्यामुळे केवळ देशाच्या सुरक्षा व्यवस्थेची ताकद वाढली नाही, तर महिलांना एक नवा आत्मविश्वासही मिळाला आहे. यामुळे महिलांना त्यांच्या क्षमता सिद्ध करण्यासाठी नवनवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. महिला सैन्यातील ही क्रांती भारताला एक नवीन दिशा देत आहे, जिथे समानता आणि प्रगती या दोन्ही गोष्टी हातात हात घालून पुढे जात आहेत.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
भाजप सत्ताधारी आणि प्रशासनाने मिळून पुण्याची जागतिक नाचक्की करून दाखवली : Aam Aadmi Party
हिंदुत्वाचा अजेंडा नेण्यासाठी भाजप मंत्र्यांना संघाचे नेते कानमंत्र देणार
फडणवीसांनी करुणा शर्माला अनेकदा विमानाने माहेरी सोडलं | Trupti Desai