‘कुठे गेलं ते मराठा आरक्षण? लाखालाखाचे मोर्चे निघाले, काय झालं त्याचं?’ 

ठाणे – गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर आज झालेल्या सभेत ठाण्यात राज ठाकरेंनी महाविकास आघाडीची चांगलीच धुलाई केली. मराठा आरक्षण ( Maratha reservation ),ओबीसी आरक्षण ( OBC reservation ), विजेची समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, भ्रष्टाचार यासह प्रखर हिंदुत्ववादी भूमिका मांडली.

यावेळी राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात जातीपातीचा चिखल होतोय. यांना यांचं जे राजकारण करायचं ते करू द्यात. पण बंधूभगिनींना माझी विनंती आहे की यातून बाहेर या. यातून आपल्या हाताला काहीही लागणार नाहीये. ही सगळी मंडळी फक्त तुमचा वापर करून घेतील. कुठे गेलं ते मराठा आरक्षण? लाखालाखाचे मोर्चे निघाले. काय झालं त्याचं? यांंना निवडणुकीसाठी फक्त तुम्हाला उचकवायचं होतं. त्यातून मतं पदरात पाडून घ्यायची होती. असं ते म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, आता यांनी नवीन ओबीसी समाजाबद्दल काढलंय. ते कोर्टात गेल्यानंतर निवडणुका पुढे ढकलल्या. मग पालिकांवर प्रशासक नेमले. म्हणजे राज्य सरकार आणि पालिका प्रशासन यांच्याचकडे… दोन्ही बाजूंनी खा.. काय हा महाराष्ट्र आपला. असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.