नव्या वर्षात कुठे होईल बक्कळ कमाई,येथे टाळता येईल नुकसान

नवीन वर्ष नवीन कल्पना, नवीन आयडीया आणि नवीन गुंतवणूक.जर यंदाचा विचार केला तर आर्थिक वर्षात मार्केटवर कोरोनाचा फार मोठा प्रभाव दिसून आला नाही.शेअर बाजाराने यंदा चांगली कामगिरी बजावली. काही शेअर्सनी तर फार चांगला परतावा दिला.सोन्याने मात्र निराशा केली.यंदाचे आर्थिकवर्ष बरेच आशादायी वाटत आहे. नवीन वर्षात आर्थिक क्षेत्रात काय घडामोडी घडतील आणि आर्थिक क्षेत्रात काय प्रगती होऊ शकते यांचा आपण अंदाज लावूया.

मुदत ठेव योजना – हे नवीन वर्ष मुदत ठेव योजनेते गुंतवणूक करणाऱ्यासाठी चांगले राहण्याची शक्यता आहे.गेल्यावर्षी मुदत ठेव योजनेमध्ये 5.1 टक्के परतावा मिळाला.महागाई दर आजच्या इतकाचा राहिला अथवा वाढला तर मात्र बँकांना मुदत ठेव योजनेवर व्याजदर वाढवावा लागेल.त्यामुळे मुदत ठेव योजनेते गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना फायदा होऊ शकतो.

शेअर मार्केट – नवीन वर्षात शेअर मार्केटमध्ये प्रचंड उलथापालथ होण्याची शक्यता आहे.यावर्षी बॉम्बे शेअर मार्केटमध्ये 20 टक्के वाढ दिसून आली.तर दुसरीकडे अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने इझी मनी पॉलिसी बंद केली. व्याजदर वाढविले. गुंतवणूकदारांनी ब्ल्यु चिप आणि लार्ज कॅप स्टॉकमध्ये थांबविणे हितकारक राहील.

बॉन्ड – जर व्याजदर अशाच प्रमाणात वाढले तर गुंतवणूकदार अधिक व्याज दरांसाठी आणि अधिक परताव्यासाठी बॉन्डकडे वळू शकतात. यंदा दहा वर्ष पूर्ण झालेल्या बॉन्डवर 6.5 टक्के व्याज दर मिळाला. यंदा अनेकजण बॉन्डकडे वळू शकतात.यावर्षी बाजारात मोठी उलढाल होऊ शकते.

सोने – 2021 मध्ये सोन्यामध्ये 5 टक्के परतावा मिळाला. मार्केटमध्ये मोठी चढ-उतार होण्याची संभावना होण्याची शक्यता लक्षात घेत सोन्यामध्ये तेजी दिसू शकते.गेल्यावर्षी पेक्षा देखील यंदा सोने अधिक भाव खाऊन जाणार आहे.

म्युच्युअल फंड – ngen markets च्या माहितीनुसार 2021 मध्ये कमी कालावधीत म्युचल फंड्स मध्ये 4.8 टक्के परतावा दिला होता.तर हायब्रीड फंडांनी 8.6 टक्के परतावा दिला होता.