मुंबई : अमेरिकेमध्ये वीर दासच्या कवितेनं सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडाली. त्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. अशीही अनेकांनी मागणी केली.
बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी त्याच्यावर टीका केली. मात्र यासगळ्यात काहींनी त्याच्या कवितेला पाठींबा दिला. यामध्ये कॉग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होता. सध्या वीर दास चर्चेचा विषय आहे.
मी अशा भारतातून आलो आहे जो नेहमी आणि पाहतो आणि सांगतो की, ही कॉमेडी नाही…यात जोक कुठे आहे?
आणि मी अशा भारतातून आलो आहे जो पाहतो आणि जाणून घेतो हाच मोठा जोक आहे…फक्त तो लोकांना हवा तेवढा ‘फनी’ नाही….
मी अशा भारतातून आलोय जिथे ‘म्युझिक’ हार्ड आहे मात्र लोकांच्या भावना कमालीच्या ‘सॉफ्ट’ आहेत….
मी अशा भारतातून आलोय जिथे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, पारसी आणि ख्रिश्चन जेव्हा आकाशात पाहतात तेव्हा…. तेव्हा आम्हा सर्वांना एकच गोष्ट दिसते ती म्हणजे पेट्रोलच्या किंमती.
मी अशा भारतातून आलो आलोय जिथे एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये लोकं राहतात. आणि सोशल मीडियावर उंची इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांवर मोठ्या धाडसानं कमेंट करतात. ते त्यांच्यापेक्षा जास्त धाडसी आहेत.
मी अशा भारतातून आलो आहे जिथे सगळेजण ग्रीन रंगासोबत खेळतात. ब्लिड ब्ल्यु चा नारा देता….मात्र ग्रीन रंगाकडून जेव्हा त्यांचा पराभव होतो तेव्हा मात्र आम्ही अचानक ऑरेंज होवून जातो….
मी अशा भारतातून आलो आहे जिथे आम्ही बॉलीवूडमुळे सोशल मीडियावर विभागलो गेलो आहोत.
मात्र जेव्हा एखादा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये जातो तेव्हा त्याच बॉलीवूडमुळे एकत्रही आलेलो असतो….
मी अशा भारतातून आलो जिथे लहान मुलं मास्क लावून एक दुसऱ्याचा हात हातात घेतात. आणि मी अशाही भारतातून आलो आहे जिथे देशाचे नेते विनामास्क एकमेकांची गळाभेट घेताना दिसतात….
मी अशा भारतातून आलो आहे जो कधीच शांत बसत नाही….आणि मी अशाही भारतातून आलो आहे जो कधीच काही बोलत नाही….
मी अशा भारतातून आलो आहे जिथे व्हेजिटेरियन असल्याचा अभिमान वेळोवेळी व्यक्त केला जातो.. मात्र त्याच शेतकऱ्यांना चिरडलं जातं जे भाजीपाला पिकवण्याचं काम करतात…..
मी अशा भारतातून आलो आहे जिथे एक मोठा गट हा तीस वर्षांपेक्षा छोटा आहे….मात्र 75 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे नेते हे अजूनही 150 वर्षांपेक्षा आपल्या जून्या आयडियाज तरुणांना ऐकवण्यास मागेपुढे पाहत नाहीत…..
मी अशा भारतातून आलो आहे जिथे तुम्ही आमचा आवाज….आमचं हसणं खिदळणं हे घराच्या भिंतीला कान देऊन ऐकु शकता….आणि मी अशाही भारतातून आलो जिथे कॉमेडी क्लबचे दरवाजे तोडले जातात आणि त्याच्या तुटलेल्या भिंतीमधून आम्हाला हसण्याचे आवाज येतात….
मी अशा भारतातून आलो जिथे दिवसा महिलांची पूजा केली जाते….आणि रात्री तिच्यावर गँगरेप केला जातो…..
https://youtu.be/3AmlxDP4tcU