कॅप्टन-भाजप युतीमुळे नेमका कुणाचा होणार फायदा ?

चंडीगड – पंजाबमधील निवडणूक मोठी रंगतदार बनत चालली आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेस (PLC) ने 2022 च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि सुखदेव सिंग ढिडसी यांच्या शिरोमणी अकाली दल (युनायटेड) सोबत युती केली आहे.

गेल्या निवडणुकीत भाजपसोबत लढलेला अकाली दल बहुजन समाज पक्षासोबत निवडणुकीच्या रिंगणात आहे. दुसरीकडे काँग्रेस सध्या एकाकी पडली आहे. एवढेच नाही तर चन्नी आणि सिद्धू यांच्यातही सर्व काही बरोबर नाही. अशा स्थितीत या उत्कंठावर्धक लढतीत युतीचे नुकसान कोणाचे होणार, याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

सी व्होटरसह एबीपी न्यूजने सर्वेक्षणात पंजाबची ही नाडी पकडण्याचा प्रयत्न केला. कॅप्टन-भाजप युतीमुळे कोणाचे नुकसान होणार, असा सवाल या सर्वेक्षणात करण्यात आला आहे. या सर्वेक्षणाच्या उत्तरात 10 टक्के लोकांनी सांगितले की, यामुळे ‘आप’चे नुकसान होईल. त्याचवेळी या आघाडीमुळे राज्यात काँग्रेसला नुकसान सहन करावे लागणार असल्याचे मत 62 टक्के लोकांचे आहे.

या युतीमुळे यामुळे अकाली दलाचे नुकसान होऊ शकते, असे 20 टक्के लोकांना वाटते. त्याचबरोबर भाजपलाच यामुळे नुकसान होऊ शकते, असे ५० टक्के लोकांचे मत आहे. याशिवाय कोणाचेही नुकसान होणार नाही, असे ४० टक्के लोकांचे म्हणणे आहे. ४० टक्के लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नाही असे दिले आहे.