ज्यांना बायकाच नाही? त्यांना का माहिती घर कस चालवा लागते? नितेश कराळे याचं टीकास्त्र

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून महागाईच्या झळा तीव्र झाल्या असून, पेट्रोल-डिझेलसह (Petrol-diesel) अनेक वस्तूंचे भाव सातत्याने वाढत आहेत. घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचे दरही वाढत असून, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात देखील वाढ झाली आहे.

आधीच लॉकडाउननंतर सामान्य माणसाचे जगणे असह्य झाले असताना, आता केंद्रातील सरकारने महागाईचा आणखी एक धक्का दिल्याने सामान्य माणूस गॅसवर गेला आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात तब्बल ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पन्नास रुपयांच्या वाढीसह 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरचे (cylinder) दर आता ९९९.५० रुपयांवर पोहोचले आहेत. इथून पुढे एका सिलिंडरसाठी एक हजार रुपये मोजावे लागणार आहेत. सिलिंडर महागल्याने गृहिणीचे आर्थिक बजेट कोलमडणार (The housewife’s financial budget will collapse) आहे.

या घडामोडींवर आता ‘फिनिक्स अॅकेडमी’चे संचालक  नितेश कराळे (Nitesh Karale) यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, घरगुती सिलिंडर ५० रुपयांनी महाग झाला आहे. ज्यांना बायकाच नाही? त्यांना का माहिती घर कस चालवा लागते?आता बोंबला न अंध भक्त असं म्हणत त्यांनी टीकास्त्र सोडले आहे.