परमबिर सिंह व सचिन वाझे भेटीमागे कोण ? चौकशी झालीच पाहिजे, कॉंग्रेसची मागणी

sachin vaze parambir singh

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंह व सचिन वाझे हे चांदिवाल कमिशनसमोर चौकशीला जाण्यापूर्वी भेटले अशी माहिती मिळतेय हे नियमाला धरुन नाही. चौकशीला जाणारे दोन व्यक्ती वा आरोपी अशा प्रकारे भेटू शकत नाहीत अशी नियमावली आहे. मग अशा परिस्थितीत ते दोघे का भेटले? कशासाठी भेटले? याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना लोंढे म्हणाले की, परमबिर सिंह व सचिन वाझे हे दोघेही अनेक प्रकरणात आरोपी आहेत. आणि अशा पद्धीतीने दोन आरोपीमध्ये चर्चा होणे गंभीर आहे, यामुळे चौकशीमध्ये बाधा पोहचू शकते. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची घटना कधी घडली नाही.

जर असं झालं असेल तर याची खोलात जाऊन चौकशी झाली पाहिजे. परमबिर सिंग आणि सचिन वाझे यांच्यामध्ये काय चर्चा झाली? त्यांच्या भेटीमागे कोण आहे ? त्यात काय कट शिजला? हे जनतेच्यासमोर आलं पाहिजे असे लोंढे म्हणाले.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=FkhUTw1OjTM

Previous Post

ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय; राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढणार 

Next Post
parag agrwal

अभिमानास्पद : गुगल, मायक्रोसॉफ्ट,आयबीएम पाठोपाठ ट्विटरच्या सीईओपदी भारतीय व्यक्ती !

Related Posts
Hathras News | त्या चमत्कारिक मातीत असे काय होते, ज्यामुळे हाथरसमध्ये चेंगराचेंगरी झाली?

Hathras News | त्या चमत्कारिक मातीत असे काय होते, ज्यामुळे हाथरसमध्ये चेंगराचेंगरी झाली?

उत्तर प्रदेशातील हाथरसमधील (Hathras News ) सिकंदरराव पोलीस स्टेशन हद्दीतील फुलराई गावात आयोजित भोले बाबांच्या सत्संगात मंगळवारी चेंगराचेंगरी…
Read More
shripal sabnis

‘फुले दाम्पत्याने ब्राह्मण समाजविरोधात नव्हे तर दिला प्रत्येक समाजातील ब्राह्मण्याविरोधात लढा’ 

पुणे : ‘सावित्रीबाई व महात्मा फुले यांची लढाई ब्राह्मण समाजविरोधात नव्हती, तर प्रत्येक समाजातील ब्राह्मण्याविरोधात होती. बहुजन, अभिजन…
Read More
केरळमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या, हुंडा म्हणून BMW न मिळाल्याने प्रियकराने तोडले होते लग्न

केरळमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या, हुंडा म्हणून BMW न मिळाल्याने प्रियकराने तोडले होते लग्न

kerala doctor suicide: केरळमधील २६ वर्षीय डॉ. शहाना यांच्या घरी लग्नसराई सुरू होणार होती. त्यांच्या घरच्यांनीही प्रियकरासोबत लग्नाला…
Read More