मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे नाव गेल्या महिन्यात चर्चेत होते. सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला NCB ने 2 ऑक्टोबरच्या रात्री मुंबई ते गोव्याच्या क्रूझवर रेव्ह पार्टी दरम्यान अटक केली होती. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानवर कडक कारवाई करत एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी खटला सुरू केला. त्यानंतर आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर केला आहे.
आर्यन खानला जवळपास 25 दिवस तुरुंगवास भोगावा लागला आणि 28 ऑक्टोबर रोजी जामिनावर सुटका करण्यात आली असली तरी त्यासंबंधीच्या आदेशाची प्रत शनिवारी उपलब्ध झाली. आर्यन खान, अरबाझ मर्चंट, मुनमून धमेचा हे केवळ क्रूझवर गेले म्हणून त्यांच्यावर कट रचल्याचा गुन्हा नोंदविण्यासाठी हे समाधानकारक कारण नाही, असे महत्त्वाचे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने एनसीबीला मोठा धक्का दिला आहे.
यानंतरच तो मुंबई उच्च न्यायालयातून जामीनज मिळाल्यानंतर बाहेर येऊ शकला. आता या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला क्लीन चिट देताना मुंबई उच्च न्यायालयाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा आरोप चुकीचा ठरवला आहे. आर्यन खानवर लावण्यात आलेल्या आरोपांचे समर्थन करणारे कोणतेही पुरावे नाहीत, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. जारी केलेल्या जामीन आदेशात मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ‘केवळ आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा एकाच क्रूझवरून प्रवास करत होते, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कट रचल्याच्या आरोपांचा आधार होऊ शकत नाही.’ अरबाझ मर्चंट, मुनमून धमेचा हे केवळ क्रूझवर गेले म्हणून त्यांच्यावर कट रचल्याचा गुन्हा नोंदविण्यासाठी हे समाधानकारक कारण नाही, असे महत्त्वाचे निरीक्षण उच्च न्यायालयाने या आदेशात नोंदवले आहे. आर्यनच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये काहीच आक्षेपार्ह नसल्याचंही न्यायालयाने स्पष्ट केलं.
यानंतर आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर चित्रपट निर्माते संजय गुप्ता यांनी मोठी गोष्ट सांगितली आहे. त्याने ट्विट करून म्हटले की, आर्यन खान, मुंबई उच्च न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे तो निर्दोष आहे आणि तो निर्दोष आहे. आता त्याला काय त्रास झाला, त्याच्या कुटुंबीयांचे किती हाल झाले, त्याची भरपाई कोण देणार.
https://youtu.be/FkhUTw1OjTM