विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीकडून कुणाला मिळणार संधी ?

मुंबई – राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या 20 तारखेला निवडणूक होणार आहे. 2 जूनला अधिसूचना जाहीर होईल. त्यानंतर 9 जून पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक आणि दहाव्या जागेसाठी पुन्हा भाजप आणि मविआमध्ये चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. सभापती रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) यांच्यासह सुभाष देसाई(subhash desai), दिवाकर रावते(diwakar Rawate), (शिवसेना) प्रवीण दरेकर(Pravin darekar), सदाभाऊ खोत(sadabhau khot), प्रसाद लाड(Prasad lad), विनायक मेटे(Vinayak mete), सुजितसिंह ठाकूर, स्व. आर. एस. सिंह, (Sujit Singh Thakur, late. R. S. sinh) (सर्व भाजप) संजय दौंड(sanjay duand) (राष्ट्रवादी) हे दहा सदस्य निवृत्त होणार आहे.

विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे सहा आणि भाजपचे चार या प्रमाणे नव्या रचनेनुसार आमदार निवडून येतील. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रामराजे निंबाळकर यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा रखडला असल्याने त्या यादीतील काही नावांचा देखील इकडे विचार होऊ शकेल असं देखील सांगितले जात आहे. दुसऱ्या जागी जेष्ठ नेते एकनाथ खडसे, शिवाजीराव गर्जे, अदिती नलावडे, यशपाल भिंगे, विकास लवांडे, राजन पाटील (Senior Leaders Eknath Khadse, Shivajirao Garje, Aditi Nalawade, Yashpal Bhinge, Vikas Lavande, Rajan Patil) यापैकी एकाला संधी दिली जाऊ शकेल. आता राष्ट्रवादीकडून नेमकी कुणाला संधी दिली जाणार हे पाहणे औत्सुक्याचा विषय असणार आहे.