‘आदित्य ठाकरे यांनी बिहारला जाऊन तेजस्वी यादव यांची भेट का घेतली? याची चौकशी व्हायला पाहिजे’

मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी नुकतेच ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या प्रकरणात, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरेंचं नाव घेतले आहे त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

रिया चक्रवर्तीला AU या नावानं 44 फोन आल्याचा दावा राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केला आहे. मुंबई पोलिसांच्या तपास AUचा उल्लेख अनन्या उधास आहे. तर बिहार पोलिसांच्या तपासात AU चा उल्लेख आदित्य उद्धव असा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळं त्याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली आहे.

दरम्यान, याशिवाय राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या भेटीवरही भाष्य केलंय. आदित्य ठाकरे बिहारला नेमके कशासाठी गेले होते? त्यांनी तेजस्वी यादव (Tejswi Yadav) यांची भेट का घेतली? याची चौकशी व्हायला पाहिजे. या भेटीमागच्या हेतूचा उलगडा व्हायला हवा, अशी मागणी राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी केली आहे.(Why did Aditya Thackeray go to Bihar and meet Tejashwi Yadav? This should be investigated).