इन्स्पेक्टर अभिजीतने दयाला का मारले? CID मधील अभिनेता दयानंद शेट्टीने दिले उत्तर

इन्स्पेक्टर अभिजीतने दयाला का मारले? CID मधील अभिनेता दयानंद शेट्टीने दिले उत्तर

गुन्ह्याचा आणि गुन्हेगारांचा शोध घेणारा अत्यंत लोकप्रिय झालेला CID हा शो सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन वर 21 डिसेंबर 2024 पासून पुनरागमन करण्यास सज्ज आहे. दर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 वाजता त्याचे प्रसारण करण्यात येईल. शिवाजी साटम (ACP प्रद्युमन), दयानंद शेट्टी (दया) आणि आदित्य श्रीवास्तव (अभिजीत) हे कलाकार पुन्हा एकदा त्याच्या गाजलेल्या भूमिकेत दिसणार आहेत. एका दिलखुलास मुलाखतीत या शोच्या पुनरागमनाबद्दल, पुन्हा प्रेक्षकांसमोर येण्याबद्दल असलेला रोमांच दयानंद शेट्टीच्या बोलण्यातून व्यक्त झाला. त्याने सांगितले की, नव्या सीझनमध्ये जुन्या आठवणींचे क्षण असतील आणि नवीन, वेधक केसिस व बरेच काही असेल.

CID परत येत आहे! इतक्या वर्षांनंतर पुन्हा दयाच्या भूमिकेत शिरताना कसे वाटते आहे?
फक्त मीच नाही, तर संपूर्ण टीम खूप रोमांचित आहे. आणि त्याहीपेक्षा आमच्या चाहत्यांचा उत्साह तर विचारुच नका! आम्ही 6 वर्षांनी परत येत आहोत. आमच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या, त्यांच्या भावना पाहिल्या की वाटते, हा शो आम्ही इतक्या लवकर बंद करायला नको होता. लोक या शो ला अजून फॉलो करतात, जुने एपिसोड आवडीने बघतात. लोक हा शो यूट्यूबवर, बसमध्ये किंवा टॅक्सीत बसूनही बघतात. असे वाटते की, त्यांचे केवळ या मालिकेशीच नाही, तर त्यातील व्यक्तिरेखांशीही एक नाते जडले आहे. त्यामुळे लोकांच्या आवडत्या दयाच्या रुपात परत येताना मला खूप आनंद होत आहे. हा दया आता CID च्या नवीन सीझनमध्ये बरेच दरवाजे तोडणार आहे.

इतकी वर्षे दयाची भूमिका करण्यातील सगळ्यात सुखद भाग काय आहे?
हा एक अद्भुत प्रवास आहे. यातला सगळ्यात आवडता भाग म्हणजे प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम. आम्ही कुठेही गेलो तरी असे कधी वाटलेच नाही, की आपला शो आता चालू नाही आहे. लोक सुरू असलेल्या मालिकांविषयी न बोलता CID विषयीच जास्त बोलत असत. हा शो अजूनही लोकांशी निगडीत आहे असे वाटायचे, जणू तो अजून चालूच असावा. याचे श्रेय प्रेक्षकांचे आहे. आमचे चाहते फारच निष्ठावंत आहेत. आजही काही चाहते माझा नंबर मिळवून मला व्हॉटस्अॅप मेसेज पाठवत असतात. मी सोशल मीडियावर फारसा सक्रिय नाही, पण लोक CID चे मीम्स शेअर करतात, त्यातल्या काही प्रसिद्ध संवादांविषयी बोलतात, हे मला माहीत आहे. त्यांचे प्रेम पाहून मी खरोखर भारावून जातो.

CID पुन्हा सुरू होत आहे, त्यामध्ये सगळ्यात जास्त आनंद तुला काशाबद्दल आहे? यावेळी तुमच्यासमोर काही आव्हाने आहेत का?
जेव्हा तुम्ही त्याच त्याच लोकांसोबत अनेक वर्षे काम करता, तेव्हा तुम्हाला एका कुटुंबासारखे वाटू लागते. त्यामुळे, माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचा भाग हा आहे की, मला CID च्या टीमसोबत काम करण्याची संधी पुन्हा मिळणार आहे. यावेळी, आव्हान हे आहे की, लोकांनी पुन्हा प्रेमात पडावे असा शो आम्हाला सादर करायचा आहे. खास करून हा शो चालू नसताना त्यांनी आम्हाला जे प्रेम दिले आहे, त्यामुळे आता ही आमची जबाबदारी आहे. उदाहरणार्थ, CID चे संवाद खूप गाजले आहेत. यावेळी आम्ही संवाद लिहिण्याचे आणि ते बोलण्याचे काम करू पण ते किती गाजतात, हे तर लोकच ठरवतील. लोकांमुळेच त्यांची मीम्स बनतात किंवा ते रोजच्या संभाषणाचा भाग बनतात. उदाहरणार्थ, नुसते दार बघितले तरी लोकांना “दया, दरवाजा तोड दो!” हा संवाद आठवतो. त्यामुळे, हे आमच्या नियंत्रणात नाही. फक्त प्रेक्षकांचे प्रेम आणि त्यांची क्रिएटिव्हिटी यामुळेच हे संवाद जिवंत राहू शकतात. त्यांचे CID शी असलेले नातेच खास आहे, आणि त्यांच्यासाठी आम्ही परत येत आहोत, याचा आम्हाला आनंद आहे.

‘बाहुबली-कटप्पा’पेक्षा एक मोठे रहस्य हे आहे की, इंस्पेक्टर अभिजीतने दयाला का मारले?
इंस्पेक्टर अभिजीतने दयाला का मारले हे कोणालाच, चाहत्यांनाही माहीत नाही. सगळ्यांच्या मनात हा प्रश्न आहे. या गोष्टीमुळे लोकांना धक्का बसला होता आणि त्याचे उत्तर जाणून घेण्याचे कुतूहलही जागे झाले होते. पण, सगळ्या काहण्यांमध्ये कलटण्या असतातच ना! तुम्हाला 21 डिसेंबरलाच ते कळेल.

तुला हे पूर्वी कधी असे वाटले होते का की, CID मालिका इतकी गाजेल आणि मालिका बंद झाल्यावरही लोक तिची इतकी आठवण काढतील?
खरं सांगायचं तर, आम्ही जेव्हा पहिल्यांदा CID सुरू केली, तेव्हा आमच्यातल्या कोणालाच ही कल्पना नव्हती ही मालिका इतकी लोकप्रिय होईल आणि एकामागून एक दशके लोक या मालिकेवर प्रेम करतील. CID ने हा दर्जा मिळवला, त्याच्या मागे समस्त टीमचे परिश्रम आहेत- आमचे लेखक, दिग्दर्शक, सह-कलाकार आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमच्या चाहत्यां…

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शरद पवारांवरील खालच्या टीकेवर अजित पवारांनी तरी बोलावं, युगेंद्र पवार यांनी व्यक्त केली खंत

पुण्यातील 10 हजार महिलांना मिळणार नाही लाडकी बहिण योजनेचा लाभ, जाणून घ्या काय आहे कारण?

संविधानाच्या अवमानावरून परभणीत हिंसाचार, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, इंटरनेट बंद

Previous Post
अजित पवारांच्या शरद पवारांशी भेटीवर शिवसेना नेत्याची प्रतिक्रिया; म्हणाले, "दोघे कधीही एकत्र..."

अजित पवारांच्या शरद पवारांशी भेटीवर शिवसेना नेत्याची प्रतिक्रिया; म्हणाले, “दोघे कधीही एकत्र…”

Next Post
अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह काका शरद पवारांची भेट का घेतली? स्वतः सांगितले कारण

अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह काका शरद पवारांची भेट का घेतली? स्वतः सांगितले कारण

Related Posts
कृषी सेवक पदभरती साठी ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

कृषी सेवक पदभरती साठी ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील कृषी…
Read More
जाणून घ्या मानवी इतिहासातील सर्वात मोठा आवाज कधी ऐकू आला आणि त्याचा काय परिणाम झाला?

जाणून घ्या मानवी इतिहासातील सर्वात मोठा आवाज कधी ऐकू आला आणि त्याचा काय परिणाम झाला?

नवी दिल्ली – जगाचा इतिहास केवळ मनोरंजकच नाही तर धक्कादायकही आहे. इतिहासात अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यांची…
Read More
Loksabha Election Results | इंडिया आघाडीकडून नितीश कुमार यांना उप-पंतप्रधान पदाची ऑफर?

Loksabha Election Results | इंडिया आघाडीकडून नितीश कुमार यांना उप-पंतप्रधान पदाची ऑफर?

लोकसभा निवडणुकीचे निकाल (Loksabha Election Results) हळूहळू येऊ लागले आहेत. यावेळी एनडीए पुढे आहे. पण, निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीही…
Read More