जाणून घ्या अखेर एनसीबीचा पंच किरण गोसावीने आर्यन खानसोबत सेल्फी का काढला?

मुंबई – अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा(Actor Shah Rukh Khan’s son Aryan Khan)  पंच किरण गोसावी (Kiran Gosavi)  सोबतचा व्हायरल सेल्फी मध्यंतरी चांगलाच चर्चेत आला होता. याच सेल्फिमुळे कॉर्डेलिया क्रूझ (Cordelia Cruise)  शिप ड्रग छापा प्रकरणातील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) केलेल्या तपासात अनियमिततेचा आरोप केला गेला होता. मात्र आता हा सेल्फी गोसावीने नेमका का घेतला होता याचा खुलासा झाला आहे.

मित्रांना दाखवण्यासाठी आर्यन खान याच्यासोबत सेल्फी काढला होता. माझ्या मित्राला आर्यन खान याचा आवाज ऐकायचा होता त्यामुळे त्यांचे फोनवरून बोलणे करून दिले अशी माहिती किरण गोसावी याने या प्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटीसमोर नोंदवलेल्या जबाबामध्ये दिली.

विशेष म्हणजे आर्यन खान याच्याकडे ड्रग्ज सापडले नव्हते, मात्र त्याच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये ड्रग्जचा उल्लेख होता, असेही त्याने सांगितल्याचे आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ने याबाबत वृत्त दिले आहे.