सीएनजी पंपावर गॅस भरण्यापूर्वी गाडीतून उतरायला का सांगितले जाते ?

cng

पुणे – पेट्रोल किंवा डिझेलपेक्षा सीएनजी (कंप्रेस्ड नॅचरल गॅस) ने गाडी चालवणे स्वस्त आहे. स्वस्त असण्यासोबतच सीएनजी इतर इंधनांच्या तुलनेत कमी प्रदूषणकारी आहे. त्यामुळे सध्या सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांचा कल झपाट्याने वाढत आहे. भारतीय रस्त्यांवर चालणाऱ्या बहुतांश टॅक्सी सीएनजीवर चालतात. अशा परिस्थितीत, कारमध्ये सीएनजी भरण्यापूर्वी, टॅक्सी चालक तुम्हाला गाडीतून उतरण्यास का सांगतो, हे तुमच्या कधी लक्षात आले आहे का?

पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी जास्त दाबाखाली ठेवल्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त असते. कोणत्याही प्रकारची गळती, दाब आणि इतर कारणांमुळे अपघात होऊ शकतात. बहुतेक गाड्या कारखान्यात सीएनजी (फॅक्टरी फिटेड सीएनजी) लावत नाहीत असे निदर्शनास आले आहे. या सर्व कारणांमुळे वाहनाला आग लागण्याचा धोका जास्त असतो.

सीएनजी पंपाची रचना पेट्रोल आणि डिझेल पंपांपेक्षा वेगळी आहे. अशा स्थितीत कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून ग्राहकाला गाडीतून उतरण्यास सांगितले जाते.यासोबतच तुम्हाला सीएनजीच्या वासाचा त्रास होऊ शकतो. हे विषारी नसले तरीही त्याच्या संपर्कात आल्याने तुमचे डोके दुखणे किंवा चक्कर येऊ शकते, त्यामुळे बाहेर पडण्याचा सल्ला दिला जातो.

Previous Post
post

बँक एफडीपेक्षा जास्त परतावा तुम्हाला पोस्टात पैसे गुंतवल्याने मिळणार ? 

Next Post
sunil mane

डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाची व विचारांची उपेक्षा ठाकरे सरकारने थांबवावी  – सुनील माने  

Related Posts
cm

कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून पाच लाख रुपयांची मदत

मुंबई – मुंबईतील कुर्ला पूर्व परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांबाबत आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief…
Read More
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा राष्ट्रवादी राज्यात साजरा करणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा राष्ट्रवादी राज्यात साजरा करणार…

मुंबई – महिन्याच्या पहिल्या शनिवारी प्रत्येक गावात ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ हा कार्यक्रम घेण्यात येतो. यामध्ये गावप्रश्नापासून ते देशस्तरावरील…
Read More

तरुणांना भुरळ पाडणारी उर्फी जावेद आहे तरी कोण? वडिलांमुळे घर सोडून गाठली होती मुंबई

Urfi Javed Biography: फॅशनच्या दुनियेत सध्या एक नाव सर्वांच्या तोंडात आहे, ते म्हणजे उर्फी जावेद (Urfi Javed). मॉडेल,…
Read More