तुम्हाला माहित आहे का? गुणरत्न सदावर्ते यांनी गाढव का पाळलं आहे ?

मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunaratna Sadavarte)  यांची अखेर १८ दिवसांनी तुरुंगातून सुटका झाली आहे.  मुंबई उच्च न्यायालयाने सदावर्ते यांना अटकपूर्व जामीन दिलाय. त्यामुळे आता पुणे पोलीस त्यांना अटक करणार नाहीत. यानंतर अटक झाल्यास २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिलेत.एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर शरद पवारांच्या घराबाहेरील आंदोलन भडकवल्याचा आरोप आहे.

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या घरचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात त्यांची मुलगी झेन सदावर्ते (Daughter Zen Sadavarte) घरात पाळलेल्या गाढवासोबत (Donkey) दिसत होती. गुणरत्न सदावर्ते यांनी गाढव का पाळलं? याबाबत बीबीसी मराठीने त्यांना प्रश्न विचारला. या प्रश्नांचे अतिशय सदावर्ते यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे.

ते म्हणाले, ‘गाढवाच्या दुधाचे किती चांगले परिणाम आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? पोटातील आजार या दुधामुळे समूळ नष्ट होतात. मुलांना आजार झाल्यानंतर त्यांना गाढवाचं दूध मिळत नाही.’ मी, माझी मुलगी झेनच्या लाडाखातर माळेगावच्या यात्रेतून घेतलं होतं. हे लोकोपयोगी आहे. मी प्राणीमित्र आहे. त्यामुळे आमच्या घरी अनेक जनावरं आहेत. सोशल मीडियावर लोक अर्धवट ज्ञानातून बोलत असतात.असं सदावर्ते यांनी सांगितले आहे.