‘सुषमा अंधारे यांना ‘हिंदू’ ची ऍलर्जी का?’; हिंदू नववर्षाच्या स्वागताचे बॅनर काढायला लावल्याचा आरोप

Pune – ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतात मात्र यावेळी सुषमा अंधारे या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. सुषमा अंधारे यांच्यावर एक खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. सुषमा अंधारे (  Sushma Andhare ) पुण्यात ज्या सोसायटीत राहतात त्या सोसायटीमध्ये गुढी पाडव्यानिमित्त लागलेल्या बॅनरला विरोध करत सोसायटीतील रहिवाश्यांना दमदाटी केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्ष सोशल मीडिया सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश गाडे ( Prakash Gade ) यांनी अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, प्रकाश गाडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर सुषमा अंधारे यांना लक्ष्य करताना काही स्क्रीनशॉट पोस्ट केले आहे ज्यात एक शिवसैनिक खासदार ओमराजे निंबाळकर यांना या संदर्भात माहिती देताना दिसून येत आहेत. गाडे यांनी पोस्ट केलेल्या स्क्रीनशॉटनुसार एक शिवसैनिक खासदार ओमराजे निंबाळकरांना सुषमा अंधारे या त्यांच्या सोसायटीच्या भिंतीवर लागलेल्या पाडव्याच्या पोस्टरला विरोध करत असल्याचं शिवसैनिकाने केलेल्या मेसेजमध्ये सांगताना दिसून येत आहे. सदर पोस्टर हे कुठल्याही पक्षाचं नसून सकल हिंदू समाजातर्फे लावण्यात आलं असल्याचं सुद्धा त्या मेसेजमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

याबाबत प्रकाश गाडे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, सुषमा अधांरे यांना ‘हिंदू’ ची ऍलर्जी का? पुण्यात सोसायटीने लावलेल्या बॅनरची एवढी हिंदू नववर्षाच्या स्वागताच्या बॅनरची एलर्जी का? एकीकडे उद्धव ठाकरे म्हणतात, आम्ही हिंदुत्व सोडलं नाही, आम्ही हिंदू आहोत असं ओरडून ओरडून सांगतात. पण, त्यांच्याच पक्षातील नेत्या सुषमा गुट्टे मात्र, ज्या सोसायटी मध्ये राहतात त्या सोसायटीत हिंदू सण साजरा करू नका अशी दमदाटी करत आहेत.

शिल्लक राहिलेल्या शिवसैनिकांची अवस्था बघा.. गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देखील देऊ शकत नाहीत. हिंदू सणांचे बॅनर लावल्याने सुषमा अधांरे यांना त्रास काय झाला? सुषमा गुट्टे यांच्या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत तिथल्या शिवसैनिकाने खासदार ओमराजे निंबाळकर यांना सर्व घडलेली हकीकत सांगितली पण, खासदार मोहदयानी बोलतो , असं म्हणून विषय टाळला. कोणत्याही राजकीय पक्षाचा बॅनर नसताना, सुषमा गुट्टे यांना राग का आला? हिंदू सोसायटी वर गुढी पाडव्याच्या शुभेच्छा नाही देणार तर ईद च्या देयच्या का? नोट : सुषमा अधांरे उर्फ गुट्टे या अट्रोसिटी टाकू शकत नाहीत. यांनी कुठं काही दमदाटी करत असतील तर बिनदास्त पणे पोलिसात तक्रार करावी. असं गाडे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, याबाबत आम्ही सुषमा अंधारे यांच्याशी संपर्क साधण्याचा तसेच त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.