बहुमतात असूनही हिवाळी अधिवेशनाला सामोरं जायला ठाकरे सरकार का घाबरत आहे ?

मुंबई – राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या 22 ते 28 डिसेंबर दरम्यान मुंबईत होणार आहे.विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला.अधिवेशन कालावधीत लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार असून आरटीपीसीआर चाचणी देखील अनिवार्य करण्यात आली आहे.

पुढच्या कामकाजासंदर्भात 24 डिसेंबरला विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती विधीमंडळ कामकाज मंत्री अनिल परब यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना दिली.

दरम्यान,अधिवेशनाला सामोरं जाण्याची सरकारची मानसिकताच नाही,अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना केली.या अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी या बैठकीत केल्याचं त्यांनी सांगितलं.