मलीकांना अटक झाल्यावर थयथयाट करणारे एसटीचा संप मिटवण्यासाठी काहीच का करत नाहीत ?

मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ३ मार्च पर्यंत ED कोठडी सुनावली आहे. काल आठ तासाच्या चौकशीनंतर ईडीने नवाब मलिक यांना अटक केली. टेरर फंडिंग केल्याचा आरोप असणाऱ्या मलिक यांच्यावर कारवाई झाल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकर्ते हे या अटकेच्या कारवाईचा निषेध व्यक्त करत आहेत.

दरम्यान, नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या समर्थनार्थ गुरुवारी सकाळी मंत्रालयाबाहेर सत्ताधारी पक्षांनी आंदोलन केले. एका बाजूला आघाडी सरकारमधील नेत्यांचा थयथयाट सुरु असताना दुसऱ्या बाजूला भाजपा नेते चांगलेच आक्रमक झाले असून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. यातच आता भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत ठाकरे सरकारवर शरसंधान केले.

ते म्हणाले, ठाकरे सरकारच्या एका मंत्रयाला अटक झाली म्हणुन महाविकास अघाडीच्या लोकांनी थयथयाट चालू केला पण राज्यात चार महिन्या पासून एसटीचा संप सुरु असून 94 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या , कर्मचाऱ्यांचे संसार रस्त्यावर आले तरीही तो संप मिटवण्या साठी सरकार काहीच करत नाही हेच दुर्दैव असल्याची प्रतिकिया राम कुलकर्णी यांनी दिली