अंत्ययात्रेला जाऊन आल्यावर अंघोळ का करावी ?

पुणे – अंत्ययात्रेवरून आल्यावर घरातील वयस्क मंडळी अंघोळ करण्याचा सल्ला देतात . काही जण याला अंधश्रद्धा मानतात , काही जण घरातला दंडक म्हणून पाळतात . पण तुम्हाला माहित आहे का कि , अंत्ययात्रेला जाऊन आल्यावर अंघोळ का करावी ?

आजच्या काळात आपण सर्वांनी अनुभवलं असें कि , शरीर स्वच्छता किती आवश्यक आहे . डोळ्यांना न दिसणाऱ्या जंतूंपासून संरक्षण व्हावे यासाठी आपण सर्वांनी हात धुणे, सॅनिटायझर वापरने , मास्क वापरणे हे सामान्य नियम पाळलेच आहेत. अनेकांनी बाहेरून आल्यावर अंघोळ करणेच पसंत केले असणार. कारण हे जंतू कपड्यावर देखील बसतात असे सांगण्यात आले . बरोबर ना ?

हेच ते कारण आहे जे आपल्या आजच्या विषयाला धरून आहे . जेव्हा तुमी एखाद्य व्यक्तीच्या मृत शरीरापाशी जाता तेव्हा त्याच्या शरीरावर असणारे विषाणू तुमच्या पण शरीरावर येण्याची शक्यता दाट असते. शरीर मृत झाल्यानंतर शरीरात अनेक केमिकल प्रक्रिया होतात ज्यामुळे शरीर डिकम्पोस होते . त्यामुळे जर तुम्ही एकाद्या मृत शरीर किंवा आजारी माणसापाशी जरी गेलात तर अंघोळ कराच .